माड्याचीवाडी : जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी येथे जिव्हाळा सेवाश्रमच्या संचालिका कु. गीतांजली बिर्जे यांचा जन्मदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी सेवाश्रमातील लाभार्थी, पदाधिकारी व मान्यवरांनी कु. गीतांजली बिर्जे यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सुरेश बिर्जे, उपाध्यक्ष राजू बिर्जे, खजिनदार साक्षी बिर्जे, सचिव संदीप बिर्जे, सहसचिव सुंदर मेस्त्री, दत्तात्रय पाटकर, संजय बिर्जे, दिपाली पाटकर व संतोष सांगळे उपस्थित होते. तसेच सल्लागार समितीचे सदस्य नाना राऊळ, बाबीदास गावडे व जयप्रकाश प्रभू यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी जिव्हाळा सेवाश्रममार्फत वृद्ध, निराधार व गरजूंसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रम प्रसन्न व स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला.