सावंतवाडी : भारतीय न्याय संहीता 2023 कलम 318 (4), माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 क, 66 ड येथे डिजिटल अरेस्ट संबंधी दि.26/11/2025 रोजी दाखल असुन सदर गुन्हयामध्ये फिर्यादी यांची 97,00,000/- ची आर्थिक फसवणुक झाली होती. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सायबर पोलीस ठाणेकडुन करण्यात येत आहे.
सदर गुन्हयाचा तांत्रिक तपास करुन तपासात आरोपी क्र. 1 हा 01/12/2025 रोजी अंधेरी येथे व आरोपी 2 हा 04/12/2025 रोजी मालवणी, मुंबई येथे मिळुन आले. त्यांची सायबर पोलीस ठाणे येथे चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिलेली आहे. आतापर्यंत सदर गुन्ह्यात अथक प्रयत्न करुन फिर्यादी यांच्या फसवणुक रक्कमेपैकी 10,62,000/-गोठविण्यात सायबर पोलीसांना यश आले आहे.
सदरची गुन्ह्यातील आरोपींची अटकेची कारवाई डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, कु. नयोमी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, विनोद कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, प्रवीण कोल्हे, सपोनि/नितीन पुरळकर, पोउनि/गणेश क-हाडकर, पोहेकॉ योगेश सातोसे, पोहेकॉ सागर भोसले, पोना/फ्रिडन बुथेलो, पोकों/ स्वप्निल तोरस्कर, पोकॉ/ऋषिकेश गुरव, मपोकों/धनश्री परब, पोकों/प्रथमेश गावडे, मपोकों/निकीता परब, मपोकॉ स्नेहल जावकर, पोकॉ युवराज भंडारी यांनी केलेली आहे.
गेल्या 15 दिवसात सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये डिजिटल अरेस्ट संबंधी तक्रारींचे प्रमाण वाढलेले असुन पोलीस ठाणेकडे दाखल झालेल्या गुन्हंयामध्ये फ्रॉडेस्टर यांनी पुढीलप्रमाणे पदधती अवलंबलेली आहे. 1) सावंतवाडी पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात मुंबई क्राईम ब्रँचमधुन पोलीस ऑफिसर बोलत असल्याचे भासवुन मनी लॉड्रिंग केसमध्ये 2) कणकवली पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात इंटरनॅशनल नंबरवरुन व्हॉटसअॅप व्हिडीओ कॉल करुन CBI अधिकारी असल्याचे भासवून मनी लॉड्रिंग केसमध्ये 3) दोडामार्ग पोलीस ठाणे येथे दाखल एका महिलेला अश्लिल फोटो व व्हीडीओ पाठवून तिला धमकी देत असल्याबाबत तक्रार आहे असे सांगून सुप्रीम कोर्टात पत्र पाठवुन तुम्हाला वाचवु शकतो असे सांगुन आर्थिक फसवणुक झालेली आहे.
सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, “डिजिटल अरेस्ट” (Digital Arrest) हा एक मोठा सायबर स्कॅम (फसवणूक) असुन लक्षात ठेवा की भारताच्या कायद्यामध्ये “डिजिटल अरेस्ट” नावाची कोणतीही प्रक्रिया अस्तित्वात नाही, पोलीस किंवा कोणतीही तपास यंत्रणा (CBL, ED, कस्टम इ.) व्हिडिओ कॉलवरून कोणालाही अटक करत नाही. सदरबाबत नागरीकांनी सतर्क रहावे. अनोळखी व्हीडीओ कॉल लगेच कट करा. अधिकृत संबंधित विभागाशी थेट संपर्क करुन त्याबाबत तक्रार करा. अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणतेही पेमेंट किंवा पैसे पाठवू नका. व्हॉट्सअॅप प्रायव्हसी सेटींगमधील Silence unknown caller ही सेटींग कार्यरत (ACTIVE) करा. अनोळखी व्यक्ति सोबत व्हॉट्सअॅप स्क्रिन शेअर करु नका, व्हॉट्सअॅप टु स्टेप व्हेरीफिकेशन करुन घ्या. जर व्हिडिओ कॉल चालू असेल, तर तुमचा कॅमेरा लगेच बंद करा. अशी घटना घडल्यास नॅशनल सायबर क्राइम हेल्पलाइनः 1930 व 1945 या टोल फ्री नंबरवर कॉल करुन तक्रार नोंदवा किंवा भारत सरकारच्या सायबर क्राइम रिपोर्टींग पोर्टल (cybercrime.gov.in) यावर तक्रार नोंदवा. नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडल्या प्रकाराबाबत माहिती द्या. घाबरू नका, शांत रहा.



Subscribe






