अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन
सिंधुदुर्ग : खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या मतदार संघात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनाच उमेदवारी द्यावी असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाने जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, अखील भारतीय मराठा महासंघ स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीमध्ये धोरण असे आहे की खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या मतदारसंघात खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना राजकीय पक्षाने उमेदवारी दयावी. यात प्राधान्य राजकीय पक्षाने मराठा समाजाची स्थानीक मतदार संघात असलेली लोकसंख्या विचारात घेवून मराठा समाजाला उमेदवारी देण्यात यावी. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना त्यांचा प्रवर्ग सोडून इतर प्रवर्गात निवडणूक लढवीता येत नाही. अश्या स्थीतीत खुल्या प्रवर्गाच्या जागी अन्य प्रवर्गातील उमेदवराला उमेदवारी दिल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे राजकीय भवीतव्य संपुष्टात येते. राजकीय आरक्षणाचा उद्देश हा संधी नाकारणे असा होत नाही. सन 2011 च्या जिल्हा परीषदेमध्ये फक्त 11 खुल्या प्रवर्गातील उमेदवार निवडून गेले. यात फक्त 9 उमेदवार हे मराठा समाजाचे निवडून आले. सिंधुदुर्ग जिल्हात मराठा समाजाची लोकसंख्या ही 65 टक्के आहे. सदरची लोकसंख्या पाहता मराठा समाजाला मिळालेले प्रतीनधीत्व हे समाधानकारक नाही.
स्थानीक स्वराज्य संस्थाची होणारी सदरची निवडणूक ही मराठा क्रांती मोर्चाला सुमारे आठ वर्ष झाल्यानंतर होत आहे. या आठ वर्षात बरीच सामाजिक स्थित्यंतरे झालेली आहेत. मराठा क्रांती मोर्चा वेळी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठींबा देणारे काही जण मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रत्यक्ष किंवा पडद्यामागे राहून जिल्ह्यात विरोध करताना दिसत आहेत. मराठा आरक्षण हे मराठा युवकांच्या आयुष्याच्या दृष्टीने जिवन मरणाचा प्रश्न आहे. अश्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मतदान करताना मराठा समाजाने विचार करावा. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांना उमेदवारी जाहीर केल्यास त्याबाबत मराठा महासंघाकडून पुढील रणनीती ठरवीण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.


Subscribe





