तिरुमला तिरुपती मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीकडून जिव्हाळा सेवाश्रमाला भेट व सामाजिक कार्यास प्रोत्साहन

कुडाळ : जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथे दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी तिरुमला तिरुपती मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटी, सावंतवाडी शाखेचे शहबाज अजिज मोहम्मद शेख यांनी भेट देऊन सेवाश्रमाच्या सामाजिक कार्याची दखल घेतली.
यावेळी श्री. शेख यांनी सेवाश्रम करीत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करताना म्हटले की, “जिव्हाळा सेवाश्रम जे कार्य करत आहे ते खरे तर देवकार्य आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी क्रेडिट सोसायटीचे कर्मचारी तसेच अन्य सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सेवाश्रमातील लाभार्थ्यांसाठी ब्लॅंकेट वाटप करून आपला “खारीचा वाटा” उचलला.
या उपक्रमात अंकुश वरवडेकर, परशुराम बाईत तसेच इतर भगिनी उपस्थित होत्या. जिव्हाळा सेवाश्रमाचे सचिव संदीप बिरजे, विश्वस्त व सल्लागार जयप्रकाश आदी उपस्थित होते.
सेवाश्रमाच्या कार्याला मिळालेल्या या पाठिंब्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून, संस्थेच्या पुढील उपक्रमांसाठी सर्वांनी शुभेच्छा

error: Content is protected !!