आडेली मतदारसंघातून शिवसेनेचे प्रबळ दावेदार – नितीन मांजरेकर

वेंगुर्ला : जिल्हा परिषद मतदार संघाचे प्रभागनीय आरक्षण जाहीर झाले आणि सगळ्यांची उत्कंठा शांत झाली. आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांना पुन्हा संधी मिळणार आहे. तर, अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात नेमकं कोण उतरणार ? निवडणूक ही महायुती म्हणून लढवली जाणार की स्वबळावर ? असे एक ना अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. याबाबतच्या अनेक खुसखुशीत चर्चा सध्या नाक्या – नाक्यावर रंगू लागल्या आहेत. अशातच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या गटासाठी आरक्षित झाल्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे…

वेंगुर्ला तालुक्यातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ… या मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर इच्छुक असल्याच्या चर्चा सध्या सर्वत्र रंगू लागल्या आहेत. नितीन मांजरेकर हे आ. दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आ. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून त्यांनी स्थानिकांच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत. ग्रामस्थांच्या सुख – दुःखात ते नेहमी सहभागी असतात. तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क असून आपले कार्यशैलीने त्यांनी प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. म्हणूनच आडेली मतदारसंघातून त्यांना ग्रामस्थांचा पाठिंबा आहे.

त्यांची आजवरची कार्यपद्धती, आ. दीपक केसरकर यांच्याशी असलेले जवळचे संबंध, सर्वसामान्य जनतेशी त्यांची जोडली गेलेली नाळ इत्यादींमुळे आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांचे नाव आघाडीवर आहे. वरील सर्व गोष्टींचा विचार करता आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.

error: Content is protected !!