जिव्हाळा सेवाश्रमात वसुबारस निमित्त गोवत्स पूजेचा सुंदर कार्यक्रम

कुडाळ : वसुबारस निमित्त श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथे पारंपरिक श्रद्धा आणि भक्तिभावाने गोवत्स पूजेचा कार्यक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी गाईंची सुंदर सजावट करून पूजन करण्यात आले. सेवाश्रमातील वृद्ध व मातृवत्सल महिलांनी या पूजेत सहभाग घेतला. गोमातेची आरती, फुलमाला व नैवेद्य अर्पण करून सर्वांनी “गोमातेचा जयजयकार” केला.

या उपक्रमात संस्था सचीव संदिप बिर्जे, सदस्य शोभा बिर्जे , आर्या बिर्जे , लाभार्थी ‌ व सेवाश्रमाचे कार्यकर्ते उपस्थित होते. समाजात गोरक्षण, गोसंवर्धन आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व याची जाणीव करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे सेवाश्रमातील वातावरण भक्तिमय झाले असून सर्वांनी हा दिवस आनंदात साजरा केला.

error: Content is protected !!