वसुबारस निमित्त विश्व हिंदू परिषद कुडाळ तर्फे गोवत्स पूजेचे आयोजन

कवठी व चेंदवण येथे भक्तिमय वातावरणात पार पडला धार्मिक कार्यक्रम


कुडाळ : वसुबारस या पवित्र सणानिमित्त विश्व हिंदू परिषद कुडाळ तर्फे पारंपरिक गोवत्स पूजेचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. हा उपक्रम दोन ठिकाणी पार पडला — कवठी येथे श्री. सुभाष जोशी यांच्या निवासस्थानी तसेच चेंदवण येथे श्री. गुणाजी परब यांच्या निवासस्थानी.
कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष श्री. अजित फाटक तसेच कुडाळ प्रखंड सहमंत्री श्री. संतोष सांगळे प्रमुख उपस्थित होते.

कवठी येथील कार्यक्रमात प्रविण कुडाळकर, प्रविण खडपकर, छोटू खडपकर, गजानन कवठेकर, रुपेश खडपकर, रुपेश वाडयेकर, सुरेश जोशी, संदीप जोशी, वैष्णवी बर्वे, सानवी कवठकर, रुतुजा मुनगेकर, साक्षी जोशी आदींनी सक्रिय सहभाग घेतला. पाच सुवासिनींनी गोमातेचे औक्षण करून पूजाविधी पार पाडला.

चेंदवण येथे दादा ठुंबरे, शाम परब, गुणाजी परब, विनायक मेस्त्री, मंदार परब, सानिका परब, अनिता परब, सारीका परब, भूमि परब, शारदा परब, केसरी परब, विनिता मेस्त्री, केशव परब आदी मान्यवर व महिला-पुरुष भक्तवर्ग उपस्थित हो

error: Content is protected !!