पणदूर ओव्हरब्रिजवर अपघात; पाच जखमी

कुडाळ – मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर ओव्हरब्रिज येथे आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच प्रवाशी जखमी झाले असून, कारचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर कार कणकवलीच्या दिशेने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना तातडीने ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या अपघातामुळे महामार्गावरील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून, पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!