मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

ग्रामपंचायत पणदूर यांच्या माध्यमातून बचत गटामार्फत दिवाळी फराळ साहित्याचे विविध स्टॉल

कुडाळ : ग्रामविकास व पंचायतराज विभाग अंतर्गत आणि ग्रामपंचायत पणदूर यांच्या माध्यमातून दिनांक २६ ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येत आहे.

महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी प्रोत्साहन मिळावे त्यांच्या हाताला रोजगार मिळावा या हेतूने महिला बचत गटामार्फत पणदूर येथे दिवाळी फराळ साहित्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तरी सर्वांनी तळागाळातील महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महिलांकडून फराळ खरेदी करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!