मांडकुली – केरवडे गावाच्या विकासासाठी आणखी एक पाऊल!

आ. निलेश राणेंकडून रस्ता व पुलाच्या कामांबाबत तात्काळ निर्णय घेऊन आवश्यक त्यात सुधारणा करण्याचे निर्देश

कुडाळ : आज कुडाळ तालुक्यातील मांडकुली – केरवडे परिसरातील तेर्से बाबंर्डे मळावाडी ब्रिज रस्ता व हायवे परिसराची पाहणी कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे यांनी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
या भागातील रस्ता व पुलाच्या कामांबाबत तात्काळ निर्णय घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.स्थानिकांच्या सोयीसाठी हा रस्ता लवकरात लवकर सुकर व सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.

यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री. संजय पडते, श्री. दादा साईल, श्री. आनंद शिरवलकर, श्री. दीपक नारकर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!