सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणामुळे बऱ्याच दिग्गजांचे पत्ते कट झाले. तर अनेकांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. कुडाळ शहराच्या अगदी लगत असलेला आणि महत्वाचा मानला जाणारा मतदारसंघ म्हणजे पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघ… या मतदारसंघातून अनेक मातब्बर नेत्यांनी जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे. येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ सर्व वर्गांसाठी खुला असल्याने अनेक दिग्गज या मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेच्या ओबीसी व्हि.जे.एन. टी. महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत.
वर्षाताई कुडाळकर यांचा आजवरचा प्रवास हा चढत्या क्रमाने राहिला आहे. सुरवातीला पिंगुळी उपविभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. काही काळ त्या पिंगुळी ग्रामपंचायतीच्या सदस्य देखील राहिल्या आहेत. त्यामुळे तळागाळातील जनतेशी त्यांचा दांडगा संपर्क असून त्यांच्या समस्या देखील त्यांना अवगत आहेत. त्यांच्या शांत, प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावामुळे अनेक जण त्यांच्याशी जोडले गेले आहेत. वर्षाताई कुडाळकर म्हणजे सर्वसामान्यांचं नेतृत्व असं समीकरणच जणू सर्वत्र प्रचलित आहे.
तेंडोली मतदारसंघातून त्या सदस्य म्हणून देखील निवडून जिल्हा परिषदेवर निवडून गेल्या आहेत. त्यानंतर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख म्हणून देखील त्यांनी यशस्वीरीत्या काम पाहिले असून सध्या त्या शिवसेना ओबीसी व्हि. जे.एन. टी. महिला जिल्हाप्रमुख या पदावर कार्यरत आहेत. आजवर पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. गेली अनेक वर्षे त्या राजकारणात सक्रिय असून राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पदराच्या गाठीशी आहे. याशिवाय उत्तम वक्तृत्वशैली, संघटन कौशल्य इत्यादी नेतृत्व करण्यासाठी लागणारे गुण त्यांच्याकडे आहेत.
आमदार निलेशजी राणे, आमदार दीपकभाई केसरकर, मंत्री उदयजी सामंत यांच्याशी त्यांचे अगदी जवळचे संबंध आहेत. शिवाय हरितसिंधु या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे. अप्रत्यक्षपणे हरितसिंधुच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरणामध्ये खारीचा वाटा उचलला आहे.
गेली अनेक त्या राजकारणात असल्यामुळे प्रशासनाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. शिवसेना पक्षाच्या उपविभागप्रमुख पदापासून ते महिला जिल्हाप्रमुख पदापर्यंतची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. तसेच जिल्ह्याच्या विविध कमिट्यांवरही त्यांनी काम केले आहे. वरील सर्व गोष्टींचा विचार करता पिंगुळी जिल्हा परिषद मतदार संघातून त्या शिवसेनेच्या प्रमुख दावेदार मानल्या जात असून शिवसेना ओबीसी व्हि.जे.एन. टी. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीधरजी पेडणेकर यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे…


Subscribe









