दोडामार्गात आयशर टेम्पोचा अपघात

गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

दोडामार्ग: दोडामार्ग-वीजघर राज्यमार्गावरील आवाडे येथे एक आयशर मालवाहू गाडी (क्रमांक GA04 T 4708) नाल्यात घसरून अपघातग्रस्त झाली आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

हा अपघात मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास झाल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. घटनेच्या ठिकाणी कोणताही चालक किंवा संबंधित व्यक्ती आढळून आलेली नाही. त्यामुळे वाहनचालक जखमी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस पाटील देसाई यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

error: Content is protected !!