कुडाळ : तालुक्यातील माडयाचीवाडी रायवाडी येथील श्री. सुरेश बिर्जे जीवन आधार चरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत मराठवाडा या भागात झालेल्या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यतीनिधी रुपये 51 हजार रुपये आज जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्याकडे धनादेश स्वरूपात देण्यात आला.
जिव्हाळा सेवाश्रम ही सेवाभावी संस्था गेली दहा वर्षे वृद्धाश्रमाची सेवा करत असतानाच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा या क्षेत्रात मदतीच्या दृष्टिकोनातून नेहमीच अग्रेसर असते. गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये अस्मानी संकट ओढवले आहे. महापुरामुळे अनेकांची भातशेती,घरे जमीनदोस्त झाली.अनेकांचे संसार उघड्यावर आले.या अस्मानी संकटात शेतकरी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.सर्व पातळीवरून या शेतकऱ्यांना मदतीचा ओघ सुरू असतानाच जिव्हाळा सेवाश्रम या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या सेवाभावी संस्थेने आपला सुद्धा या मोहिमेत खारीचा वाटा असावा या उद्देशाने आज त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत रुपये 51 हजार चा धनादेश श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुरेश बिर्जे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे दिला. वृद्धाश्रमाची सेवा करणाऱ्या जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून ही पूरग्रस्तांना दिलेली मदत निश्चितच कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्री सुरेश बिर्जे चॅरिटेबल ट्रस्टचे समाजसेवक सुंदर मेस्त्री, राजू बिर्जे,संजय बिर्जे, संदीप बिर्जे ,जयप्रकाश प्रभू, बाबा गावडे, तुकाराम परब आदी उपस्थित होते.

जिव्हाळा सेवाश्रमकडून मराठवाड्याला ५१ हजार रुपयांची मदत
1
/
93
पणदूर मयेकरवाडी येथे सापडलेल्या अजगराला जीवनदान #kudal #pandur #sindhudurg
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर हे कमिशन एजंट #kudal #sindhudurg
ओंकार हत्ती झोळंबे गावात दाखल #dodamarg #omkarhatti
माझी ओळख ही माझ्या आवशीमुळे
रामेश्वर स्टोअर्स कुडाळ येथे केवा कायपो इंडस्ट्रीजचा शुभारंभ #kudal #marketing #retail
झाराप रेल्वे स्थानकावर सुरू असलेला मायनिंग साठा पूर्णपणे बेकायदेशीर #vaibhavnaik #sindhudurg
बापाशीन एकट्यान काम करायचा आणि तुम्ही बसान खातालात | आवस आणि झिलाची भांडणा
एसीबी चौकशीवर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया #vaibhavnaik #sindhudurg
पाट - म्हापण रस्त्यावर पहिल्याच पावसात साचलं पाणी #patmhapan
नाटकवेडा सत्तू अर्थात "आवस आणि झिलाची" एक्सक्लुझिव्ह मुलाखत
माझा प्रभाग माझी जबाबदारी गेली कुठे - विलास कुडाळकर #kudal #sindhudurg
रक्तदान करण्याबाबत मंदार गावडे यांचे कळकळीचे आवाहन #blood #bloodbank #sindhudurg
1
/
93

Subscribe










