बुवा श्री हेमंत तेली व बुवा श्री सुजित परब
सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आयोजन
संतोष हिवाळेकर/पोईप
पोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थ पोईप यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केली आहे तरी सर्व भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती
यानिमित्त कार्यक्रम सायं.4वाजता पोईप गावातील ग्रामस्थांची संयुक्त भजने,सायं 6 वाजता सहा श्री समर्थ समई नृत्य खुडी देवगड आणि खास आकर्षण म्हणून रात्रौ ठिक 8.30 वाजता 20/20 डबलबारी भजनाचा जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे
श्रीपावणादेवी प्रासादिक भजन मंडळ फोंडाघाट बुवा श्री. हेमंत तेली गुरुवर्य कै बुवा मनोहर सावंत, भजन सम्राट बुवा श्री रामदास कासले, संगीत अलंकार गुरुवर्य बुवा श्री अजित गोसावी ,पखवाज श्री जयानंद नारायण तेली ,तबला भावेश लाड, झांज स्वप्निल तेली ,विरुद्ध कोटेश्वर प्रसादिक भजन मंडळ हरकुळ बुद्रुक कणकवली बुवा श्री सुजित परब गुरुवर्य बुवा श्री उदय राणे, पखवाज श्री तुषार लोट, तबला हर्षद राणे यांच्यात डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे तरी भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक पोईप आदर्श शिक्षक संघटना व ग्रामस्थ पोईप यांनी केली आहे


Subscribe










