तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत प्रशालेला द्वितीय क्रमांक
कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथील विद्यार्थी कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत आपल्या प्रशालेतील विद्यार्थी सहभागी होते, यात आपल्या प्रशालेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. सौ.गवस मॅडम यांनी विज्ञान विषयातील “स्वच्छता सर्वांसाठी “या विषयावर नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले व त्यांना प्रशालेतील सर्व शिक्षकांचे, शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे ,मार्गदर्शक शिक्षकाचे अभिनंदन.
पालक श्री.सुचित साळसकर व सांगळे सर यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. शाळा समिती अध्यक्ष श्री देवेंद्र नाईक यांनी आपली गाडी देऊन विद्यार्थ्यांची जाण्यायेण्याची सोय केली. गाडी चालवण्यासाठी माजी विद्यार्थी श्री.समीर खडपकर यांनी मदत केली त्याबद्दल श्री. देवेंद्र नाईक साहेब,श्री.साळसकर व श्री.खडपकर यांचे चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई व विद्यालयाच्या वतीने आभार.