कुडाळ येथे नगरपंचायतीच्या ट्रॅक्टरची दोन दुचाकींना धडक

ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट फळांच्या दुकानात घुसला

ट्रॅक्टरच्या खाली आल्याने दोघे गंभीर जखमी

      कुडाळ ग्रामीण रूग्णालय समोरील मुख्य रस्त्यावर नगरपंचायतीच्या ट्रॅक्टरने दोन दुचाकींना धडक दिली. त्यानंतर ट्रॅक्टरने तेथील फळांच्या दुकानालाही धडक दिली. यात दुचाकीस्वार रूपेश रमेश पडते (वय 45, रा.कुडाळ) व त्यांच्या मागे बसलेले दिपूकुमार यादव (वय 20, रा.कुडाळ) या दोघांना गंभीर दुखापत झाली. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले. तर आणखी एकाला किरकोळ दुखापत झाली. हि घटना शुक्रवारी सायंकाळी पावणे चार वाजताच्या सुमारास घडली. 
     नगरपंचायतीचा ट्रॅक्टर काॅलेज चौकातून गांधीचौकाच्या दिशेने जात होता. त्याचवेळी चालकाने ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या विरूद्ध बाजूला जात समोरून येणा-या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीधारक श्री. पडते व त्यांच्या मागे बसलेले  श्री. यादव दोघेही रस्त्यावर ट्रॅक्टर खाली सापडले. त्यांना गंभीर दुखापत झाली तर काहीवेळापूर्वीच तेथे रस्त्यालगत दुचाकी उभी करून दुकानात  बसलेल्या एका दुचाकीस्वार युवकाच्या दुचाकीलाही त्या ट्रॅक्टरने धडक देत दुचाकी फरफटत नेत तेथील फळांच्या दुकानाला धडक. यात तेथे बसलेल्या त्या दुचाकीस्वार यूवकालाही किरकोळ दुखापत झाली. नागरीकांनी दोन्ही जखमींना ट्रॅक्टर खालून बाहेर काढत तेथीलच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेत दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले तसेच फळांच्या दुकानाचेही नुकसान झाले. घटनेची माहीती मिळताच नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी, न.पं. अधिकारी व नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.
error: Content is protected !!