ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीने देवीचे आगमन
मा. आ. वैभव नाईक यांनी सपत्नीक केली देवीची पूजा व आरती
सालाबादप्रमाणे कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज घटस्थापने दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. माजी आमदार वैभव नाईक यांनी सपत्नीक देवीचे विधिवत पूजन करून शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत देवीची आरती करण्यात आली. शिवसेनेच्या वतीने गेली १४ वर्षे नित्यनेमाने दुर्गामातेची प्रतिष्ठापना व विविध कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील घटस्थापनेपासून ०३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत देवीची नित्यपूजा,आरती, विविध सांस्कृतिक,धार्मिक,मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. देवीसाठी आकर्षक असा दरबार व देवीच्या आसनाला आकर्षक फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
देवीच्या आगमनानिमित्त कणकवली बाजारपेठेतून नरडवे फाटा नजीक असलेल्या शिवसेना नवरात्रोत्सव स्थळापर्यंत जल्लोषात दुर्गामातेचा जयजयकार करत, फटाक्यांची आतषबाजी करून ढोलताशाच्या गजरात देवीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांसह कणकवलीतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी सौ. स्नेहा वैभव नाईक, शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, कन्हैया पारकर, नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष विलास गुडेकर, खजिनदार महेश कोदे, जेष्ठ शिवसैनिक अनिल हळदीवे, राजू शेटये,राजू राणे,सचिन सावंत, सतीश नाईक,बंडू ठाकूर, बाळा भिसे,मंगेश सावंत,रुपेश आमडोसकर,हर्षद गावडे, संतोष परब,महेंद्र डिचोलकर, अविनाश सावंत, अजय सावंत,संजय पारकर,रोहित राणे, भालचंद्र दळवी, मंगेश राणे,विशाल कसालकर, स्वप्नील पाटील,किरण वर्दम, महिला तालुकाप्रमुख वैदही गुडेकर, प्रतीक्षा साटम,माधवी दळवी,दिव्या साळगावकर, मीनल म्हसकर, संजना कोलते, धनश्री मेस्त्री, अर्पिता परब, जैबा कुरेशी, रोहिणी पिळणकर साक्षी आमडोस्कर, प्रतिभा अवसरे,अजित काणेकर,अमोल म्हापसेकर,मंगेश राणे, संदीप गावकर,प्रवीण सावंत,उदय सर्पे, शिरी घाडीगांवकर,श्री. मर्ये,ओमकार चव्हाण, अरुण परब, उत्तम सुद्रीक, लक्ष्मण हन्नीकोड,मिलिंद आईर,विक्रांत सरंगले, पराग म्हापसेकर, रवींद्र कदम, सचाभाई, उद्धव पारकर, जगन्नाथ आजगावकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
1
/
100
माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात कुडाळात निदर्शने #kudal #vinayakraut
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न #kankavli
गुणवत्ता हि आजच्या काळातील खरी संपत्ती - नगराध्यक्ष संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
कणकवलीच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घेणार | संदेश पारकर एक्सक्लुझिव्ह मुलाखत | वाढदिवस विशेष
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकरयांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत #kankavli #sindhudurg
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा भावी खासदार म्हणुन उल्लेख.... #kankavli #sindhudurg
संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचे उपक्रम म्हणजे कलेची नांदी - प्रसाद राणे #kankavli #sandeshparkar
लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना कामाचे लेखी आदेश दिले जातील #kudal #sindhudurg
आम्हाला ३-४ महिने पगार मिळत नाही #kudal #sindhudurg
संदेश पारकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार - सुशांत नाईक #kankavli #sindhudurg
हिंमत असेल तर अंकुश जाधव यांनी मोर्चा काढून दाखवावा - संदीप कदम #sindhudurg
वेताळ बांबर्डे (कदमवाडी) येथे विहिरीत पडला बिबट्या
1
/
100


Subscribe










