जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगुळी गोंधयाळेचा (मराठी माध्यम)माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

कुडाळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगुळी गोंधयाळे (मराठी माध्यम) माजी विद्यार्थी स्नेह मेळावा २०२५
शाळेच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा आज शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या मेळाव्यात बालपणातील गोड आठवणी शिकवणीचे संस्कार आणि आजचे जीवनमूल्य यावर आठवणींचा सुंदर ठेवा रंगला.
शाळेच्या भौतिक सुविधा व विकासासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी दाखवलेली कटिबद्धता आणि शाळेबद्दलची आपुलकी ही शाळेसाठी प्रेरणादायी ठरली.
पालक-शिक्षक-माजी विद्यार्थी यांचे नाते आणखी वृद्धिंगत व्हावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेतर्फे उपस्थित सर्व मान्यवर व माजी विद्यार्थी/विद्यार्थिनी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!