पिंगुळी येथील रहिवासी प्रवीण उर्फ महेश गावडे यांचे निधन

कुडाळ : पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील रहिवाशी प्रवीण उर्फ महेश गावडे यांचे दुर्दैवी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराने ग्रस्त होते. आजाराशी झुंज देत असताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

महेश यांच्या शांत व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांचेच प्रिय होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

error: Content is protected !!