पणजी : पेरीभाट – मेरशी येथे घरफोडी करून १० लाख रुपयांचे दागिने व इतर वस्तू चोरी करण्यात आले होते. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी मूळ कुडाळ – महाराष्ट्र येथील सराईत गुन्हेगार अनंत उर्फ अक्षय म्हाडेश्वर याला अटक केली आहे.गोवा खाना
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पूजा माणगावकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, २८ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ ते २९ आॅगस्ट रोजी उत्तररात्री २.१५ दरम्यान अज्ञात चोरांनी खिडकीतून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. फ्लॅटमधील १० लाख रुपये किमतीचे ३० ग्रॅम सोन्याचे नाणे, २ ग्रॅम कानातली, एक नाकाची पिन, ४० ग्रॅमचे मंगळसूत्र, ४० ग्रॅम दोन बांगड्या, २ ग्रॅम कानातली, ४ ग्रॅम अंगठी व इतर वस्तू चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद केले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साईश भोसले यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही व इतर चौकशी केली असता, दुचाकीवरुन चोर जात असल्याचे समोर आले. उत्तर गोवा पोलिसांनी पथक तयार सदर दुचाकीचा शोध घेतला असता, दुचाकी मेरशी येथील असल्याचे समोर आले. पथकाने दुचाकी चालक अनंत उर्फ अक्षय म्हाडेश्वर याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीत त्याने चोरी केल्याचे कबुली दिली. तसेच त्याच्या विरोधात महाराष्ट्रातील कुडाळ पोलीस स्थानकात चार घरफोडी व इतर चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. संशयित सराईत गुन्हेगार असून त्याला शिक्षाही झाल्याची समोर आले आहे.













