बांबुळी येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह कुडाळ-सांगिर्डेवाडी येथे सापडला

कुडाळ : बांबुळी येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह कुडाळ-सांगिर्डेवाडी येथील नदीत सापडला. सागर बांबुळकर (वय ३०) असे या तरुणाचे नाव असून, तो १९ ऑगस्टपासून बेपत्ता होता.

बांबुळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील निवृत्त पोलीस पाटील शंकर महादेव बांबुळकर यांचा मुलगा असलेला सागर हा १९ ऑगस्ट रोजी घरातून निघून गेला होता. त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागत नव्हता. कुटुंबीयांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

काल, त्याचा मृतदेह कुडाळ-सांगिर्डेवाडी येथील नदीपात्रात तरंगताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि पुढील कार्यवाही सुरू केली. या घटनेमुळे बांबुळी गावात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!