शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते यांच्या हस्ते झाले लोकार्पण
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गेल्या आर्थिक वर्षांमध्ये जिल्हा नियोजन आराखड्यातून जांभवडे कुंभारवाडी-भंडारवाडी ट्रांसफार्मरसाठी तब्बल 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या ट्रांसफार्मरचे काम पूर्ण झाले असून श्री गणेश चतुर्थी सणापूर्वी या ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले.
यावेळी भंडारवाडी कुंभारवाडी येथील ग्रामस्थ तसेच सरपंच अमित मडव यांनी गेली अनेक वर्षे या भागातील कमी दाबाच्या विद्युत पुरवठा मुळे होणाऱ्या त्रासापासून श्री गणेश चतुर्थी पूर्वी मुक्तता झाल्यामुळे खासदार मान. नारायणराव राणे, आमदार मान. निलेश राणे, जिल्हाप्रमुख मान.दत्ता सामंत, उपनेते मान.संजय आंग्रे तसेच या ट्रान्सफॉर्मरच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणारे मान.दादा साईल यांचे आभार व्यक्त करून येणाऱ्या काळात या भागात शिवसेना घरा घरात पोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले…
यावेळी शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, विभाग प्रमुख विठ्ठल तेली, ज्येष्ठ शिवसैनिक बाळा राणे, विभाग संघटक गुणवंत सावंत, उपविभाग प्रमुख सचिन तेली, शिवसेना महिला तालुका प्रमुख सौ. रचना नेरुरकर, सचिव सौ रेवती राणे, माजी पं.स. सदस्य बाळू मडव, सरपंच अमित मडव, कुपवडे सरपंच दिलीप तवटे, प्रवीण राऊळ, हनुमंत मुळीक, सखाराम परब, अंकुश म्हाडदळकर, उदय मडव – सदस्य, संतोष पावसकर – उपसरपंच धनंजय जाधव, रोहित मडव, सुनील गायकवाड, भाई कदम, मंगेश म्हाडदलकर, राकेश वेंगुर्लेकर, वामन चव्हाण, धनंजय सावंत आदी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…














 
	

 Subscribe
Subscribe









