वैभववाडी तालुक्यातील खांबाळे धनगरवाडी येथील समाज बांधवांची साधला संवाद
खांबाळे धनगरवाडी चा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाला समाज बांधवांनी जाहीर केला पाठिंबा
यावेळी धनगर समाजाचे कार्यकर्ते गंगाराम उर्फ बाबू अडुळकर, खांबाळे गावचे रहिवासी समाज बांधव दाजी बर्गे, बाबाजी देसाई, गंगाराम आडुळकर, रमेश बर्गे, संजय गुरखे, अंबाजी बोडेकर, हितेश बर्गे, भरत बर्गे, विठ्ठल अडुळकर, बाळकृष्ण बर्गे ,दिनेश बर्गे, रामचंद्र शेळके, संतोष शेळके नाना शेळके बाबू शेळके, नारायण शेळके सविता बर्गे, बाळकृष्ण बर्गे, संजय बर्गे, सुनंदा बोडेकर, व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अर्ज न करता मागणी न असता जुन्या मीटर बदलून स्मार्ट मीटर न सांगता बदलले गेल्या बाबत संबंधित विभागाला निवेदन देण्याचे ठरले.
दळणवळणाची सुविधा हळदीचा टेंब धनगरवाडीला होणे बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. याबाबत पुढील ध्येय धोरण ठरवून या ठिकाणी महासंघांकडून गावाच्या मर्यादित समाज बांधवांचा विकास होण्यासाठी व सातत्यपूर्वक संपर्कात राहण्यासाठी उपस्थित आतून 17 समाज बंधू-भगिनींची एक संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या ठिकाणी बूथ प्रमुख ते कोकण प्रमुख असा उपक्रम राबविण्यात येणार असून वैभववाडी तालुक्यातील खांबाळे धनगरवाडीकडून घोंगडी बैठकीच्या माध्यमातून नवल राज काळे यांनी समाज बांधवांना एक संदेश दिला आहे की आपल्याला आपल्यासाठी लढायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन आपण संघर्ष केला पाहिजे वाडी वस्ती वरती गटतट बाजूला ठेवून स्वच्छ मनाने स्वच्छ भावनेने काम करणाऱ्या समाज सेवकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आपली कामे मार्गी लागण्याकरिता सर्वांनी त्याला पाठिंबा देणे गरजेचे आहे. दिलेली वचन पूर्ण करण्याकरिता निश्चितपणाने समाजाच्या पाठीशी उभा राहणं माझं प्रथम कर्तव्य आहे तुमच्या प्रत्येक संघर्षात नवल राज काळे तुमच्या सोबत ठामपणे उभा राहील असा विश्वास नवलराज काळे आणि उपस्थित समाज बांधवांना दिला. अशाच घोंगडी बैठका प्रत्येक वस्ती वरती महासंघाचा कार्यकर्ता करेल अध्यक्ष आणि कार्यकर्ता याच्यामध्ये कोणताही फरक नसेल अध्यक्ष हा कार्यकर्ता म्हणून काम करेल आणि प्रत्येक कार्यकर्ता हा अध्यक्ष म्हणून काम करेल आणि अशा प्रकारचं काम जर आपण सामाजिक संघटने कडून केलं तर निश्चितपणाने आपण समाजाला उन्नतीकडे घेऊन जाऊ शकतो अशा प्रकारचे समाज प्रबोधिनी संभाषण या ठिकाणी नवलराज काळे यांच्या माध्यमातून उपस्थित त्यांना देण्यात आले.
वेळ पडल्यास आपली ताकद उभी करून आपल्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता शासन दरबारी आवाज उठवू शासनाने नवीन काही शासन निर्णय काढलेले आहेत त्या शासन निर्णयाचा अभ्यास करून प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी काय मार्ग निघतो यासाठी आपण प्रयत्नशील राहू आपण सर्व गाववाले असे संघटित राहून आमच्या सोबत काम करा असे आवाहन केले असता उपस्थित समाज बांधवांनी कोकणात नवलराज काळे यांच्या नेतृत्वात ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे गेले कित्येक दिवस उत्तम चालू आहे त्यांच्या महासंघाच्या कोणत्याही संघटनेला विरोध नाही त्यामुळे त्यांची भावना स्वच्छ आहे आणि स्वच्छ भावनेने काम करणाऱ्या समाजबांधवांच्या पाठीशी उभा राहण आमच सर्वांचे कर्तव्य आहे असं वक्तव्य करत सर्व समाज बांधवांनी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ सोबत काम करण्यासाठी महासंघाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
लवकरच कोकण प्रदेश महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल त्यानंतर जिल्हास्तरीय अध्यक्ष आणि तालुकास्तरीय अध्यक्ष व कार्यकारिणी जाहीर करण्यात येतील लवकरच आपण सर्वांनी एकजुटीने सर्वांगीण विकासासाठी संघर्ष करून समाजाला उन्नतीकडे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध राहू या असे प्रतिपादन करून सदर सभा संपली यावेळी सर्व उपस्थित पदाधिकारी यांनी व समाज बांधव यांनी चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले.













