तुमच्या कॉलची सेटिंग्स अचानक बदलली आहे?

तुमच्या कॉल वर सरकारची पाळत? की मोबाईल हॅक

काय आहे खरं कारण?; जाणून घ्या

ब्युरो न्यूज: हल्लीच्या काही दिवसांत अनेक अँड्रॉइड वापरकर्त्याच्या फोन मध्ये कॉल ची सेटिंग्स आपोआप बदलली आहे.अँड्रॉइड फोनवरून एखाद्या व्यक्तीला कॉल करताना किंवा आलेला कॉल रिसिव्ह करताना फोनचा इंटरफेस म्हणजेच डिस्प्ले आणि डिझाइन बदललेलं दिसत आहे.कुठल्याही सेटिंग्समध्ये बदल किंवा छेडछाड न करता आपोआप डिस्प्ले कसाकाय बदलला, या शंकेने अनेकांना गोंधळात टाकले आहे. आपला फोन हॅक तर नाही ना झाला, अशी शंकाही काहींनी उपस्थित केली.अनेक अँड्रॉइड युझर्सनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून याबाबत माहिती शेअर केली आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जगभरातील अँड्रॉइड वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनमध्ये झालेल्या या बदलाबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलं आहे.

बदल फक्त अँड्रॉइड फोन मध्ये

हे बदल फक्त अँड्रॉइड फोनमध्ये झाले आहेत. आयओएस फोनमध्ये अशा प्रकारे बदल झालेला नसल्याने तो फोन वापरणाऱ्यांना काळजी करण्याचं कारण नाही.पण अँड्रॉइड फोनमध्ये हे बदल नक्की कशामुळे झाले, या सेटिंग्स नेमक्या कशा बदलल्या, त्या पुन्हा पूर्वीसारख्या करता येणार का?

काय आहे खरं कारण?

तर, सर्व अँड्रॉइड फोनचं सॉफ्टवेअर गुगलकडून तयार केलं जातं आणि त्याच्याकडूनच अपडेटही केलं जातं.कंपनीने ‘मे 2025’ मध्ये घोषणा केली होती की, ते ‘मटेरिअल 3 डी एक्स्प्रेसिव्ह’ नावाचे अपडेट आणत आहेत, जे मागील काही वर्षांतील सर्वात मोठ्या अपडेट्सपैकी एक असेल.या अपडेटद्वारे फोनमधील सॉफ्टवेअर आणि डिस्प्लेचा वापर अधिक सोपा आणि जलद आणि अधिक माहितीपूर्व होईल, अशी माहिती गुगलकडून देण्यात आली आहे.यापूर्वी आपल्या अँड्रॉइड फोनचा डिस्प्ले ‘मटेरिअल 3D’ या डिझाइनवर चालत होता. गुगलच्या माहितीनुसार ‘अब्जावधी युझर्सद्वारे नियमितपणे वापरला गेल्यानं त्यांना त्याची सवय झाली होती.गुगलने सांगितलं की, नवीन डिस्प्ले सेटिंग्जमध्ये अनेक गोष्टी बदलल्या जात आहेत. जसे की नोटिफिकेशन्स, कलर थीम्स, फोटोज, जीमेल आणि वॉच इत्यादी. यातील अपडेट्सदेखील याचाच एक भाग आहे.

युझर्सच्या परवानगीशिवाय या सेटिंग्स कशा बदलल्या?

गुगलने सांगितलं की ‘मटेरियल 3डी एक्सप्रेसिव्ह’ या अपडेटअंतर्गत अँड्रॉइड फोनच्या कॉल अ‍ॅपचं डिझाइन बदलण्यात आलं आहे.हे अपडेट सुरुवातीला जूनमध्ये काही वापरकर्त्यांना देण्यात आलं होतं आणि नंतर टप्प्याटप्प्यानं मोठ्या प्रमाणावर रोलआऊट करण्यात आलं.गुगलच्या म्हणण्यानुसार, यामागचा उद्देश कॉलिंग अ‍ॅप अधिक सोपं करणे हा आहे.गुगलने ‘रिसेन्ट’ (अलीकडील कॉल्स) आणि ‘फेव्हरेट्स’ हे पर्याय काढून टाकले असून त्यांना ‘होम’मध्ये मर्ज केलं आहे. त्यामुळे आता तुम्ही फोन अ‍ॅप उघडल्यावर तुम्हाला फक्त ‘होम’ आणि ‘कीपॅड’ हे पर्याय दिसतील.कंपनीच्या म्हणण्यानुसार, आता एकाच नंबरवरून आलेले सर्व कॉल्स एकत्रितपणे किंवा एकाच ठिकाणी दाखवले जाणार नाहीत, तर कॉल हिस्ट्रीमध्ये वेळेनुसार दाखवले जातील. त्यामुळे तुम्हाला वारंवार कॉन्टॅक्ट शोधायची गरज पडणार नाही.

error: Content is protected !!