वेंगुर्ला : तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजता घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने वेंगुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी सोलापूर येथील मूळ रहिवासी असलेल्या बालाजी हरी सुतार (वय २५) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलीला तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन संशयित आरोपी बालाजी सुतार याने पळवून नेले. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांनी तात्काळ वेंगुर्ला पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी बालाजी सुतार याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३६३ (अपहरण) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस आरोपी आणि मुलीचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.