ग्रामस्थांच्या वतीने विनोद तावडे यांचा सत्कार
कणकवली : कोकणातील जागृत देवस्थान आणि पाच शेर पाणी जाळणारी म्हणून जिची ख्याती आहे अशी सिंधुदुर्गातील प्रसिद्ध देवस्थान श्री देव गंगो अनभवानी मातेच्या दर्शनाकरिता राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे यांनी डामरे येथे येत सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाध्यक्ष प्रभाकर सावंत राज्य परिषद सदस्य राजू राऊळ कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विनोद जी म्हणाले लहानपणापासून या देवीचे आमच्या घरामध्ये वर्षाला ओटी भरली जाते तसेच कोणत्याही शुभ कार्याला जाताना देवी अनुभवाने मातेचे आम्ही दर्शन नेहमीच घेत असतो घरातील कोणत्याही कार्यक्रमाला आम्ही या देवीची आराधना करत असतो जसे तावडे घराण्याची कुलस्वामिनी तसेच आमच्या सर्वांच्या नवसाला पावणारी म्हणून ही देखील आई अनभवानी आमच्यासाठी नेहमीच जागृत ठरली आहे. गावच्या वतीने सर्व मानकरी तसेच ग्रामस्थ यांनी विनोद तावडे यांचा सत्कार केला. यावेळी गावचे माजी सरपंच बबलू सावंत विद्यमान सरपंच किरण कानडे उपसरपंच सागर साटम भाजपा बूथ प्रमुख अभिषेक सावंत ग्रामपंचायत सदस्य संतोष मेजारी रघु जाधव विनिता सावंत ग्रामपंचायत सदस्य सौ पारकर गावचे मानकरी रोहिदास गुरव मानकरी संजय सावंत ,योगेश सावंत, प्रकाश सावंत, रघुनंदन सावंत,सहदेव गावकर, सुशील सावंत, उमेश गावकर भास्कर सावंत अविनाश सावंत विजय सावंत पोलीस पाटील श्री विश्वास सावंत विनायक पारदिये, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप जाधव, व मान्यवर उपस्थित होते.













