पोलिस बनून लुबाडणाऱ्या ‘इराणी’चा पर्दाफाश

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

दिनांक 04.08.2025 रोजी वेंगुर्ला पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं 71/2025 भारतीय न्याय संहीता 318 (2), 318(4), 319(2),204, 3(5) व सावंतवाडी पोलीस स्टेशन गु रजी न. 146/2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 204, 319(2) 3(5) हे दोन्ही गुन्हे पोलीस असल्याची बतावणी करून अज्ञात इसम यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास तांत्रिक विश्लेषण व सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पाहिजे आरोपीत इसम सांगली येथे असल्याची माहिती मिळाली. नमूद माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने सतत चार दिवस व रात्र सांगली येथे कसून शोध घेतला असता नमूद संशयित इसम विश्रामबाग परिसरातील पेट्रोल पंप येथे फिरत असताना मिळून आला. म्हणून त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करून त्याच्या नावा गावाची खात्री केली असता त्याने आपले नाव अबूतालीब मुसा इराणी, वय-31, राहणार इराणी वस्ती, रेल्वे स्टेशन नजीक, जिल्हा- सांगली असे सांगितले. नमूद संशयित इसमाकडे वरील दोन्ही गुन्ह्यांबाबत विचारणा केली असता सदरचे पोलीस बतावणी संबंधी गुन्हे आपण केले असल्याचे कबुली दिलेली आहे.नमूद संशयित इसमास वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे अटक करण्यात आलेली असून त्यास माननीय न्यायालयात रिमांडकामी हजर केले असता त्याला दिनांक 18/08/25 रोजी पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश प्राप्त झालेले आहेत.

सदरची कारवाई मा. डॉ. श्री. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व मा. कुमारी नवमी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक, श्री. प्रविण कोल्हे, यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल हाडळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल- अनुपकुमार खंडे, बस्त्याव डिसोझा, जॅक्सन घोंसालविस व पोलीस कॉन्स्टेबल- अमर कांडर, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग यांनी केलेली आहे.

error: Content is protected !!