सामाजिक कार्यकर्ते नवलराज काळे यांच्या पाठपुराव्याला यश

प्रति लाभार्थी कुकुट खाद्य ची एक बॅग आज होणार उपलब्ध

चांदा ते बांदा योजनेतून कुकुट पिल्लांना चार बॅग पुरवठा न झाल्याबद्दल दिला होता उपोषणाचा इशारा संबंधित विभागाकडून चार पैकी एक बॅग प्रति लाभार्थी आज 13 ऑगस्ट रोजी उपलब्ध करून दिले असल्यामुळे सदर उपोषण तूर्तास स्थगित

उर्वरित प्रति लाभार्थी तीन बॅग व शेडनेट आठ दिवसाच्या आत लाभार्थ्यांना न दिल्यास सिंधुदुर्ग जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन कार्यालय येथे लाभार्थ्यांसहित उपोषण व आंदोलन छेडणार नवलराज काळे यांचा इशारा

जोपर्यंत बचत गटांच्या ताईंना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालूच राहील उपोषणाचे व आंदोलनाची दिशा आठ दिवसानंतर लाभार्थ्यांसोबत एकत्र बसून ठरवली जाईल सामाजिक कार्यकर्ते नवलराज काळे यांनी दिली माहिती

या पाठपुराव्यामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे व भारतीय जनता पार्टी वैभववाडी पदाधिकाऱ्यांचं, उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या सर्व लाभार्थ्यांचं, उपोषण न करण्याकरिता सदर मागणी पूर्ण होण्याकरिता उमेद समन्वयक कदम, पशुसंवर्धन विभाग डॉक्टर बिलोलीकर, गटविकास अधिकारी, वैभववाडी तालुका तहसीलदार, कृषी विस्ताराधिकारी, व गटविकास कार्यालय मधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मागणी पूर्ण होण्याकरिता मेहनत घेतली त्यांचे, प्रभाग संघ अध्यक्ष सीआरपी बचत गट अध्यक्ष व सर्व ज्ञात अज्ञात विशेष सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचं श्री काळे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!