कुडाळ नगरपंचायत तसेच डाकोजु फाउंडेशन, कुडाळ रोटरी क्लब, क्रेडाई सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष वितरण
कुडाळ : नगरपंचायत तसेच डाकोजु फाउंडेशन, कुडाळ रोटरी क्लब, क्रेडाई सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत वृक्ष वितरण करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियान ६ व हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत वृक्ष लागवड व वृक्ष वाटप करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीने शहरातील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करणे तसेच शाळेच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड करणे असा कार्यक्रम हाती घेतला आहे या कार्यक्रमाला डाकोजु फाउंडेशन कुडाळ रोटरी क्लब क्रेडाई सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थांनी हातभार लावला आहे या संस्थांमार्फत कुडाळ नगरपंचायतीला ५०० वृक्ष देण्यात आले आहेत या वृक्षांचे वाटप कुडाळ शहरातील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले शहरातील बाबाचांद उर्दू शाळा, केळबाईवाडी येथील कुंभारवाडा प्राथमिक शाळा व एमआयडीसी कुंभारवाडा शाळा या शाळांच्या विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले यावेळी कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर रोटरी क्लब अध्यक्ष राजीव पवार, क्रेडाई सिंधुदुर्गचे गजानन कांदळगावकर, नगरसेविका नयना मांजरेकर चांदणी कांबळे, नीता गोवेकर, अभिषेक माने, प्रमोद भोगटे, रूपेश तेली, बाबाचांद उर्दू शाळा मुख्याध्यापक शबाना मुल्ला, केळबाईवाडी प्राथमिक शाळा कुंभारवाडा मुख्याध्यापक स्वप्नाली सावंत, एमआयडीसी कुंभारवाडा शाळा मुख्याध्यापक घाडीगांवकर आदी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.


Subscribe





