कणकवली नागवे रोड व जुना नरडवे रोडवरील खड्डे लवकर बुजवा

तेजस राणे; युवा सेनेच्या माध्यमातून कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

कुडाळ : श्रावण महिना चालू असल्याने स्वयंभू रवळनाथ मंदिर मध्ये धार्मिक कार्यक्रम सुरु असल्याने या रोड वर रहदारी वाढली आहे तसेच लवकरच गणपती उत्सव सुरु होणार असून या काळात शहरात वाहतुकीचा व नागरिकांच्या हालचालींचा मोठा ओघ असतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर मार्गांवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून, कणकवली पटकीदेवी मंदिर ते कणकवली राममंदिर, नागवे रोड तसेच पटकीदेवी मंदिर ते कामतसृष्टी पर्यंतचा रस्ता या परिसरातील सध्या ठिकठिकाणी मोठे खड्डये पडलेले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी व गवत भरपूर प्रमाणात वाढले असून, काही ठिकाणी झाडांच्या फ़ांद्या रस्त्यावर झुकलेल्या आहेत, त्यामुळे वाहन चालकांना अडचण निर्माण होत आहे.

यामुळे रस्त्यावरील पडलेले सर्व खड्ड्ये बुजवावे, रस्त्याच्या बाजूला वाढलेली झाडी झुडपे त्वरीत साफ करावी, शहरात भटक्या कुत्रांची संख्या वाढली असून यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करा, अशी मागणी युवासेना तालुका समन्व्यक तेजस राणे यांनी कणकवली नगरपंचायतच्या मुख्यधिकारी यांच्याकडे केली. यावेळी सोबत शाखाप्रमुख महेश राणे देखील उपस्थित होते. मुख्यधिकारी यांनी सर्व मागण्या लवकरच मार्गी लावून पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही दिली.

error: Content is protected !!