मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन ही मोठी सामाजिक बांधिलकी: चारुदत्त देसाई

बॅ. नाथ पै शिक्षण. संस्थेतर्फे ११जुलै रोजी सिद्धेश गाळवणकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त नेरूर येथे मोफत शिबिराचे आयोजन


“मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन ही मोठी सामाजिक बांधिलकी आहे.बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था ज्यांच्या त्यागातून उभी राहिली त्यांना अशा प्रकारे मोफत आरोग्य शिबिरातून आदरांजली देण्यात आली .त्याचा गरजू लोकांनी उपयोग करून घेतला पाहिजे. उमेश गाळवणकर यांच्या पुढाकाराने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या फिजिओथेरपी महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय यांच्या वतीने असे उपक्रम राबविले जात आहेत हे कौतुकास्पद आहे. यामोफत शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी उपयोग करून घ्यावा यामुळे सर्वांना आपले निरोगी आयुष्य जगणे शक्य होईलअसे उद्गार नेरूरचे माजी सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष चारुदत्त देसाई यांनी काढले .ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था संचलित कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर व बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालय व फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्या सहकार्याने आयोजित मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतांमध्ये “नेरुर परिसरातील रुग्णांना आरोग्याची उत्तम सोय या रुग्णालय व रिसर्च सेंटर मुळे प्राप्त झालेली आहे. याचा लोकांनी उपयोग करावा” . अशा सामाजिक उपक्रमांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही केले व वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर हृदयरोग तज्ञ डॉ. राहुल गवlणकर, संस्था, चेअरमन उमेश गाळवणकर, त्यांचे आई -वडील सुंदर गाळवणकर उभयत,संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, पल्लवी कामत ग्रामस्थ पांडुरंग नाईक, निवासी डॉ. सायली गावडे, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल, डॉ . ज्योतिरंजन पलटासिंग इत्यादी उपस्थित होते.


उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन व सिद्धेश गाळवणकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्या नंतर अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना डॉ.राहुल गवाणकर यांनी आपल्या मनोगतातून ” नफ्या तोट्याचा विचार न करता लोकहितासाठी विविध रोगावर उपचार शिबिराचे बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे आयोजन करण्यात येते. ही फार मोठी गोष्ट आहे. संस्थेच्या वाटचालीस हातभार लावलेले सिद्धेश गाळवणकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करून लोकांना आरोग्य विषयक सेवा पुरविल्या हे फार कौतुकास्पद आहे .अशा उपक्रमास आपण सर्वतोपरी मदत करू. असे आश्वासनही दिले.
शिबिराच्या आयोजनाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना उमेश गाळवणकर यांनी ” लोकांना वेदनामुक्त करण्यासाठी या शिबिराचा उपयोग झाल्यास यासारखा आनंद नाही. परिस्थिती अभावी काहीना दुखणी घेऊन आयुष्य कंठlवे लागते. त्यांना या शिबिराच्या निमित्ताने दिलासा मिळाला तर त्यासारखे समाधान नाही. यासाठी लोकांनी या आरोग्य शिबिरात सहभागी होऊन उपयोग करून घ्यावा असे आवाहनही केले. या शिबिराचा एकूण ८६ लोकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुमन करांगळे- सावंत यांनी केले.

error: Content is protected !!