नामांकित हॉटेल्समध्येही मिळाली संधी
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील रिगल कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंटने पुन्हा एकदा आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील अंतिम वर्षातील चार विद्यार्थ्यांची थेट मुंबईतील जागतिक कीर्तीच्या “हॉटेल ताज” येथे नोकरीसाठी निवड झाली आहे, ही रिगल कॉलेजसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
याव्यतिरिक्त, कॉलेजच्या इतर विद्यार्थ्यांनाही विविध नामांकित हॉटेल्समध्ये उत्तम प्लेसमेंट मिळाले आहे. यामध्ये नियो मॅजेस्टिक (गोवा), इरा बाय आर्किड हॉटेल (मुंबई), किचन गार्डन (मुंबई), आयटीसी फॉर्च्यून (मुंबई), बेकD अँड हाऊ बेकरी (मुंबई), क्लब महिंद्रा (गोवा) आणि फेअरमॉन्ट हॉटेल (मुंबई) यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.
रिगल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री संजयराव शिर्के आणि प्राचार्या श्रीमती तृप्ती मोंडकर यांच्या अथक मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्लेसमेंट प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. आज हे विद्यार्थी आपल्या कठोर परिश्रमामुळे आणि कॉलेजने दिलेल्या दर्जेदार शिक्षणामुळे स्वतःचे व रिगल कॉलेजचे नाव उंचावत आहेत.
या भरघोस यशाबद्दल कॉलेजचे अध्यक्ष मा. संजयराव शिर्के सर, संचालिका डॉ. सुमिता शिर्के मॅडम, प्राचार्य, सर्व प्राध्यापक आणि संपूर्ण कर्मचारीवर्गाने विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच, त्यांच्या पुढील वाटचालीस उत्तमोत्तम शुभेच्छाही दिल्या आहेत. रिगल कॉलेजचे हे यश हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.