एम एच नर्सिंग सीईटी दिलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी लाभ घ्यावा.
ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींना 2025-26 या शैक्षणिक वर्षात बी.एस.सी नर्सिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की ज्यांनी नर्सिंग सीईटी दिलेली आहे या उमेद्वारांनी प्रवेश निश्चित होण्यासाठी शासनाच्या प्रवेश प्रकीयेद्वारे भाग घेऊन ऑनलाईन प्रकिया पूर्ण करणे गरजेचे आहे. त्या प्रक्रियेचे वेळापत्रक शासनाच्या सीईटी सेल मार्फत त्यांच्या www.mahacet.org या संकेत स्थळावर दिलेले असून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज ०८ जुलै २०२५ ते १७ जुलै २०२५ या कालावधीत निश्चित करावयाचे आहे या साठी आवश्यक शासकीय नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांना वरील नमुद तारखेपर्यत सीईटी सेल ला भरणे आवश्यक आहे.
दर वर्षी अनेक विद्यार्थी सदरील नोंदणी करत नाहीत आणि मुदत संपल्यानंतर बीएससी नर्सिंग प्रवेश घेण्यासाठी येतात परंतु सीईटी सेल ला नोंदणी केलेले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही व त्यांचे एक वर्षाचे शैक्षणिक नुकसान होते हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी शासनाने दिलेल्या मुदतीत आपली नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करावा.
सदरील प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व प्रवेश प्रकिया सुलभ व्हावी या साठी बॅ नाथ पै नर्सिंग महाविद्यालयात मोफत नोंदणी प्रकिया कक्ष सुरु करण्यात आलेला आहे. (संपर्क क्र- ९८६०१८३९७१, ९४०४९२३३०३, ७५१७२१७०६३ ) सदर कक्षाद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून देण्यात येईल.
तरी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा असे आवाहन बॅ. नाथ पै नसिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या कल्पना भंडारी तसेच बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले आहे