सावंतवाडी : बस मधून प्रवास करणाऱ्या नेपाळी प्रवाशाचा उपचारादरम्यान आंबोली येथे मृत्यू झाला आहे. ते खाजगी बसणे गोवा ते नेपाळ असा प्रवास करत होते. मात्र त्यांना वाटेतच अस्वस्थ वाटू लागल्यामुळे अधिक उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान ते मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. बलबहादुर कालीबहादुर खडका (वय ५४, रा. डाडागाव नेपाळ) असे त्यांचे नाव आहे. याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याबाबतची खबर सुमित सोनार (रा. नाशिक) यांनी दिली आहे.