ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डेने ( भारतीय जनता पार्टी पुरस्कृत समर्थ विकास पॅनल) दिलेला शब्द पूर्ण केला

मरगळवाडी, आंबेरकर वाडी, कोरगावकर टेंब येथे नवीन ट्रान्सफार्मर चे बहुचर्चित बहुप्रतिक्षित विकास काम पूर्ण

मरगळवाडी, आंबेरकर वाडी, कोरगावकर टेंब येथील असलेल्या कमी विद्युत प्रवाहामुळे तेथील ग्रामस्थांना बरीच वर्षे विद्युत त्रासाला सामोरे जावे लागत होते घरगुती तसेच व्यावसायिक दृष्ट्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते तेथील ग्रामस्थांचा हा जिव्हाळ्याचा विषय बनला होता.
सदर समस्येबद्दल होणाऱ्या विद्युत त्रासाबद्दल तेथील ग्रामस्थ यांनी आपला विषय आपली व्यथा,समस्या समर्थ विकास पॅनलच्या समोर व्यक्त केली . ग्रामस्थांची व्यथा लक्षात घेऊन सदरील काम समर्थ विकास पॅनलच्या “देवू तो शब्द पूर्ण करू” या आश्वासक विचारांच्या माध्यमातून काम पूर्ण करण्याचा विश्वास तेथील ग्रामस्थ यांना देण्यात आला .
हे काम पूर्णत्वास नेण्याकरता ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे ( भारतीय जनता पार्टी पुरस्कृत समर्थ विकास पॅनल), भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री रुपेश कानडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला.

          *हा पाठपुरावा  रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय विद्यमान खासदार श्री नारायणराव राणे साहेब तसेच कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे  लोकप्रिय आमदार श्री निलेश जी राणे साहेब आणि तत्कालीन सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री सन्मा.श्री रवींद्र चव्हाण साहेब   यांच्या जवळ करण्यात आला खासदार श्री नारायणराव राणे साहेब यांच्या शिफारसी नुसार व आमदार श्री निलेशजी राणे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून भरीव असा निधी या कामाकरता मंजूर करण्यात आला* 

मंजूर कामाचे भूमिपूजन दि. ०५-०४-२५ रोजी उपस्थित सर्व ग्रामस्थ पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले निधी मंजूर करून दिल्याबद्दल तत्कालीन पालकमंत्री साहेब विद्यमान खासदार साहेब तसेच विद्यमान आमदार साहेब यांचे उपस्थितांकडून आभार व्यक्त करण्यात आले सदरील कामाचे भूमिपूजन करून ग्रामस्थ यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली.

अनेक प्रश्नांना समस्यांना सामोरे जात अखेर हे काम पूर्णत्वास नेण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून या कामाचे लोकार्पण करण्यात आले व बरीच वर्षे प्रलंबित असलेल्या मरगळवाडी, आंबेरकर वाडी, कोरगावकर टेंब येथील जिव्हाळ्याचा, जोखड बनून राहिलेला प्रश्न सोडवण्यात आला.
भारतीय जनता पार्टी पुरसस्कृत समर्थ विकास पॅनल यांनी देऊ तो शब्द पूर्ण करू या आश्वासक विचारांच्या माध्यमातून मरगळवाडी, आंबेरकर वाडी, कोरगावकर टेंब येथील ग्रामस्थांचे विद्युत प्रवाहाच्या त्रासातून कायमस्वरूपी मुक्तता केली याकरिता तेथील ग्रामस्थ यांच्याकडून आभार व समाधान व्यक्त केले जात आहे.

सदरील कामासाठी गावातील ग्रामस्थांनी व जमीन मालक यांनी सहकार्य केले त्यामुळे हे शक्य झाल्याची भावना सरपंच व सदस्य यांनी व्यक्त केली व आभार मानले तसेच यासाठी सरपंच श्री रामचंद्र परब,उपसरपंच सौ. रोहिणी हळदणकर, ग्रा. सदस्य श्री महेंद्र मेस्त्री, श्री गुणाजी जाधव, श्री अजय डिचोलकर, श्री संतोष डिचोलकर सौ. प्रणाली साटेलकर, सौ. माधवी कानडे, सौ.धनश्री गवस आदी ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य व उपस्थिती लाभली.

error: Content is protected !!