कुडाळ : काल वेताळ बांबर्डे येथे काही कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. हा प्रवेश पूर्णतः फसवा असल्याचे उबाठाचे शाखाप्रमुख पिंटू दळवी यांनी म्हटले आहे.
या कार्यकर्त्यांमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य संजना पाटकर यांनी प्रवेश केला. संजना पाटकर या ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस पुरस्कृत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. संजना पाटकर आणि इतर कार्यकर्त्यांनी आजपर्यंत कधीही उबाठा सेनेचे काम केलेले नाही. हे सर्वजण भाजपचे छुपे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. आत्ताच झालेल्या खासदारकीच्या निवडणुकीतही या सर्वांनी भाजपचेच काम केले होते. हे कार्यकर्ते उबाठा सेनेचे होते असे सिद्ध झाल्यास राजकारण सोडून घरी बसू असे वेताळ बांबर्डे उबाठा सेनेचे शाखाप्रमुख पिंटू दळवी यांनी स्पष्ट केले आहे.
या फसव्या प्रवेशामुळे उबाठा सेनेचे उमेदवार वैभव नाईक यांना होणाऱ्या मतदानात कोणताही फरक पडणार नाही. वेताळ बांबर्डे गावातील मतदार आणि सर्व शिवसैनिक आमदार वैभव नाईक यांनी गावात केलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. आणि पुन्हा एकदा सर्व सामान्यांचा आमदार म्हणून वैभव नाईक यांना जास्तीत जास्त मताधिक्य देतील असा माझा ठाम विश्वास आहे. असे पक्ष प्रवेश दाखवून स्थानिक नेत्यांचे राजकीय वजन वाढत असेल तर असे पक्षप्रवेश खुशाल करून घ्यावेत त्यासाठी नेहमी शुभेच्छा राहतील. असे उबाठाचे शाखाप्रमुख पिंटू दळवी यांनी स्पष्ट केले आहे.