समाज माध्यमांवर व्हायरल होणारा संदेश चुकीचा

मतदार यादीतून नाव वगळल्यास नव्याने नाव नोंदणी करणे बंधनकारक

जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांची माहिती

सिंधुदूर्ग : गेल्या अनेक दिवसांपासून समाज माध्यमांवर एक चुकीचा संदेश व्हायरल होत आहे. या संदेशामध्ये असे नमूद आहे की , ‘मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले असतानाही मतदान केंद्रावर गेल्यावर 17 नंबरचा फॉर्म भरल्यानंतर मतदान करता येते’. अशा प्रकारचा चुकीचा संदेश पसरवला जात आहे. या संदेशाचे जिल्हा प्रशासनाकडून खंडन करण्यात आले असून याबाबत सत्यता पुढीलप्रमाणे.

मतदान यादी मधून मतदाराचे नाव वगळल्यास मतदान करता येत नाही. अशावेळी मतदाराने आपल्या नावाची नव्याने मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदवण्यासाठी नामनिर्देशनच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदाराला संधी असते, त्यानंतर मतदार यादी मध्ये नाव नोंदविता येत नाही. त्यामुळे समाज माध्यमांवर व्हायरल होणारा मेसेज चुकीचा असून कृपया नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये तसेच असा संदेश इतरांनाही फॉरवर्ड करू नये असे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *