जनाब उद्धव ठाकरेंचे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी योगदान ते काय..?

हिंदू देवता व धार्मिक आस्था जपणाऱ्या रुढींबाबत अपमानास्पद वक्तव्ये करणाऱ्या सुषमा अंधारे बाई उद्धव ठाकरेंच्या पक्षाची स्टार प्रचारक म्हणून जिल्ह्यात येणे ही लांछनास्पद बाब..!

सिंधुदुर्गातील सुज्ञ जनता उद्धव ठाकरेंच्या हिंदू द्वेषी भूमिकेचा निवडणुकीत वचपा काढणार.. प्रसाद गावडे

सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे व त्यांचे चिरंजीव पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात आणि माशांवर ताव मारून निघून जातात. निवडणूकांच्या संभामध्ये मर्द, गद्दार,पाठीत खंजीर अशा शब्दांच्या मोठ्या फुशारक्या मारायच्या आणि राणे कुटुंबावर टीका करून कार्यकर्त्यांची माथी भडकवाची बस एवढेच कार्य जनाब उद्धव ठाकरेंचे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी योगदान आहे हे जिल्ह्यातील सुज्ञ जनता जाणते. हिंदू देवता व हिंदूंच्या धार्मिक आस्था जपणाऱ्या रुढींबाबत टीका व अपमानास्पद वक्तव्ये करणाऱ्या सुषमा अंधारे बाई उद्धव ठाकरेंच्या स्टार प्रचारक होऊन जिल्ह्यात येऊन सभा घेतात हे जिल्हावासियांच्या मनाला पटलेले नसून याचा जनतेत तीव्र असंतोष आहे. रामायण,महाभारत या हिंदूंची आस्था जपणाऱ्या पुराण ग्रंथांची चेष्टा करणे, भगवान राम, श्रीकृष्ण, नवदुर्गा देवी या देव देवतांबाबत टिंगलटवाळी करणे,ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, जनाबाई आदी साधू संतांबाबत संतापजनक वक्तव्ये करून हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या सुषमा अंधारे बाई उबाठा पक्षाचे उमेदवार वैभव नाईक, राजन तेली व संदेश पारकर यांच्यासाठी जिल्ह्यात येऊन प्रचारसभा घेते ही अतिशय लांछनास्पद बाब असून अशा हिंदूद्वेषी प्रवृत्तीच्या बाईंसोबत व्यासपीठ शेअर करणाऱ्यांना “जनाची नाही, निदान मनाची तरी लाज वाटली नाही कशी” हा खरा प्रश्न आहे.जिल्ह्यात येऊन फक्त नारायण राणे कुटुंबावर बोलण्याएवढाच धंदा उद्धव ठाकरे व त्यांच्या नेत्यांचा असून जिल्ह्यातील सुज्ञ जनता यापुढे त्यांच्या भावनिक राजकारणाला मुळीच बळी पडणार नाही. “म्हातारी मेल्याचं दुःख नाही मात्र काळ सोकावता कामा नये” म्हणून येत्या 20 तारखेला हिंदूद्वेषी प्रवृत्तीच्या उबाठा पक्षाच्या उमेदवारांना योग्य धडा शिकवा व महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडेंनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *