कुडाळ : आवेरा गावचे रत्न मा. श्री. प्रकाश आकेरकर यांचा कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशिय संघटना कुडाळ. माझा लोकराजा महोत्सव याच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कोकणची अस्मिता जपणारी आणि भारतीय संस्कृती जतन करणारी लोककला म्हणजेच दशावतार कला.
आपण दशावतारातील कर्मयोगी आहात. कुशाग्र बुद्धिमत्ता, आढळ ध्येयवाद निर्मळ भावना आणि रंगमंचाचे सामाजिक भान यामधून आपले बहुआयामी व्यक्तिमत्व..
आवेरा ते वेंगुर्ला पायी चालत हार्मोनियम सरावासाठी डोक्यावर हार्मोनियम घेऊन आपल्या कलेची आवड पूर्णत्वात करून व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले.
आपली अठरा वर्ष पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ कंपनीमध्ये हार्मोनियम वादक म्हूणन कार्यरत होते. प्रकाश आकेरकर उर्फ भाई आकेरकर यांचे नाट्य संगीत ऐकण्यासाठी नाट्य प्रेमी आवर्जून नाटक पाहण्यासाठी येत.
प्रकाश आकेरकर हे आवेरे गावचे भाई या नावाने हार्मोनियम वादक म्हणून प्रसिद्ध झाले.
कालांतराने व्यवसायात शरीर साथ देत नसल्याने घरीच राहिले.परंतु कलेची आवड असल्यामुळे ते शांत बसले नाहीं. त्यांनी नवोदित स्थानिक वीस कलाकारांचा संच तयार करून त्यांना मार्गदर्शन देऊन सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ ही कंपनी स्थापन केली.
सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ हि कंपनी नवोदित कलाकारांना घेऊन आली.त्यांना अल्प कालावधीत नाट्य रसिकानी या कंपनीला पसंती दिली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली कै. बाळू मुननकर तसेंच संतोष शिरोडकर, काका आकेरकर, दादा केळुसकर असे कलाकार घडवले. त्यांचा मुलगा अमोल आकेरकर यांनी त्याचा पावलावर पाऊल ठेवून त्याचे त्याचे मार्गदर्शन घेऊन सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ या कंपनी मध्ये हार्मोनियम वादन करतो. तसेंच त्यांचा पुतण्या काका आकेरकर याच्या कडे त्यानीं आपल्या नाट्य कंपनीचा धुरा सांभाळायला दिला.
अशा या कला आणि कलाकार यांचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय स्थापन झालेली घटना सामाजिक बांधिलकी जपत आहे.
या दशावतार कलेसाठी आपण केलेल्या साधनेच्या गौरव करणे हे आमची कर्तव्य समजतो. यासाठी सन्माननीय आदरणीय आवेरे गावचे रत्न श्री प्रकाश आकेरकर यांसाठी शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह सन्मानपत्र, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर शिवसेना ज़िल्हा प्रमुख दत्ताजी सामंत, नगरसेविका चांदणी कांबळी आणि मान्यवर उपस्थित होते.