महाराष्ट्र शासनकडून अत्यावश्यक संच सुधारित योजनेस मान्यता
श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती
इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणासाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. शासनाकडून कामगारांसाठी यापूर्वी गृहपयोगी वस्तुसंच व सुरक्षा संच योजनेचा लाभ कामगारांना देण्यात आलेला असून आता महायुती सरकारने पात्र नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच (Essencial kit)वितरण योजनेस मान्यता दिली आहे. या अत्यावश्यक संचामध्ये पत्र्याची पेटी (Galvanized Trunk), प्लास्टिकची चटई (Plastic Mat), धान्य साठवण कोठी (क्षमता 25 किलो) ( Grain Storage Tank) (Capacity 25 kg), धान्य साठवण कोठी (क्षमता 22 किलो) ( Grain Storage Tank) (Capacity 22 kg) , बेडशीट (Bedsheet), चादर (Chaddar), ब्लॅंकेट (Blanket), साखर ठेवण्यासाठीचा डबा (क्षमता 1 किलो) (एस एस 202 ) ( Sugar Container) (1 Kg) (SS 201) , चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा (क्षमता 500 ग्रॅम) (एस एस 202 ) (Tea Container) (500 gram) वॉटर प्युरिफायर (18 लिटर) ( Water Purifier) (18 ltr) (SS 202) With 2 candle या वस्तूंचा समावेश असून लवकरच या संदर्भातील शासन स्तरावर निविदा प्रक्रिया कार्यवाही राबवून कामगार बांधवांना लाभ देण्याचे धोरण शासनाकडून आखण्यात आले आहे. प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी प्रमाणित केलेल्या पात्र यादीनुसारच वितरण केले जाणार आहे. याशिवाय नव्याने नोंदणीत झालेल्या कामगारांना सुरक्षा संच वितरणास देखील कामगार विभागाने मान्यता दिली असून लवकरच वितरणा संदर्भात पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष श्री प्राजक्त चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिली असून गोरगरीब कामगारांच्या मूलभूत गरजा यांचा विचार करून कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महायुती सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










