Category कणकवली

कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्गच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचे ठोस पाऊल

सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार सिंधुदुर्गमधील रेल्वे सुविधांबाबत सकारात्मक निर्णय होणार नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आणि गणपती स्पेशल गाड्यांचे थांबे वाढविणार कोकण रेल्वे प्रवासी समिती च्या भेटीत मंत्री नितेश राणे यांची समस्यांवर सविस्तर चर्चाकणकवली : कोकण रेल्वे…

दशावतारातील बालगंधर्व म्‍हणून ओळखले जाणारे प्रशांत मेस्‍त्री यांचे विजेच्या धक्क्याने निधन

अंत्ययात्रा उद्या शनिवार 2ऑगस्ट रोजी सकाळी 9- 30 वाजता निघेल कणकवली : दशावतार नाट्यकलेत आपल्या उत्कृष्ट स्त्री भूमिकांसाठी ओळखले जाणारे आणि ‘दशावतारातील बालगंधर्व’ म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कलाकार प्रशांत रामचंद्र मेस्त्री (वय ५०, रा. हरकुळ खुर्द सुतारवाडी) यांचे विजेच्या धक्क्याने…

कलमठ ग्रामपंचायतच्या स्वच्छता जागराला उत्स्फूर्त प्रतिसाद

घरोघरी केला जातोय स्वच्छ कलमठ संकल्प प्रचार सरपंच संदीप मेस्त्री स्वतः सहभागी कणकवली : कलमठ गावात स्वच्छता जागराला ग्रामस्थांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून. पहिल्याच दिवशी नव्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. कलमठ येथे १ ऑगस्ट पासून कचरा संकलन नव्या नियमात…

फुलांच्या पाकळ्यांनी खुलला रिगल कॉलेजचा परिसर !

कणकवली : रिगल कॉलेज कणकवली येथे पार पडलेल्या फ्लॉवर पेटल स्पर्धेने संपूर्ण परिसर फुलांच्या सौंदर्याने नटवला. विद्यार्थांनी कल्पकतेचा उच्चांक गाठत फुलांच्या पाकळ्यातून मनमोहक कलाकृती साकारल्या. या स्पर्धेत एकूण १४ गटांनी सहभाग घेतला होता ज्यामध्ये “मदनमंजिरी”, “रातराणी”, “फ्लॉवर क्वीन”, “कुरुक्षेत्र”, “सांजधारा”,…

कणकवली ब्लेड हल्ल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी, एक फरार

कणकवली : घरात साफसफाई करण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणावर ब्लेडने हल्ला केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील एक संशयित मात्र अद्याप फरार आहे. मंगळवारी (२९ जुलै) रात्री ९.३०…

वृद्धेचा जळून मृत्यू

कणकवली येथील घटना कणकवली : कणकवली शहरातील कांबळेगल्ली येथील भालचंद्र नगर येथे एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या रत्नप्रभा शंकर पंडित (८५, मूळ रा. हळवल) या आग लागल्याने भाजल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. ही…

ऑगस्ट पासून कचरा संकलनासाठी नवे नियम

ग्रामस्थांनी सहकार्य करावे कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांचे आवाहन कणकवली : शहरातील कलमठ गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे. १ ऑगस्ट पासून सार्वजनिक ठिकाणी व नदी पात्रात कचरा टाकताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नदीपात्रात…

वाघेरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार !

पालकमंत्री नितेश राणे यांचे आश्वासन वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबईच्या पदाधिकारी व सदस्यांनी घेतली भेट कणकवली : तालुक्यातील वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबईच्या पदाधिकारी व सदस्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची मुंबई येथे जुहू निवासस्थानी…

हद्दपारचे आदेश अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांनी मोडले

कणकवली पोलिसांनी घेतले ताब्यात दोघांवरही आदेश भंगाचा केला गुन्हा दाखल कणकवली : तालुक्यातील कुर्ली वसाहत येथील अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावर गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांनी एक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार केले होते. मात्र हद्दपारी आदेशाचा भंग…

कोकणकन्या एक्स्प्रेसमधून पडून तरुणाचा मृत्यू

कणकवलीजवळ घडली घटना कणकवली : मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसमधून (गाडी क्रमांक २०१११) पडून राहुल संतोष सावर्डेकर (वय २९, रा. चिपळूण, रत्नागिरी) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास कणकवली तालुक्यातील जानवली येथे ही घटना…

error: Content is protected !!