शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची मंत्री नितेश राणे यांनी केली पोल खोल
प्रचार संपायला काही तास शिल्लक असताना नितेश राणेंनी टाकला मोठा राजकीय बॉम्ब
मंत्री नितेश राणे यांच्या गौप्यस्फोट सर्वत्र खळबळ
संदेश पारकर यांना भाजपात घेण्यास नारायण राणे यांनी दिला नकार
कणकवली : ३० कोटी आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देवून मला भाजपमध्ये घ्या अशी मागणी शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी आमच्याकडे केली होती.रवींद्र चव्हाण आणि माझ्या सोबत त्यांनी चर्चा केली. त्यानंतर मोपा विमानतळ येथे बैठक सुद्धा झाली. ३० कोटी द्या आणि नगराध्यक्ष पद या अटीवर ते ठाम होते. मात्र त्यांची ही मागणी आम्ही धुडकावून लावली. आमच्या समीर नलावडे आणि इतर सहकाऱ्यांवर अन्याय करून तुम्हाला उमेदवारी देणार नाही. अशी स्पष्ट भूमिका घेत आम्ही संदेश पारकर यांची मागणी धुडकावून लावली. असा गौप्यस्फोट मंत्री नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.आपण नाकारल्यामुळेच शहर विकास आघाडी उभी करण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचे ही ते म्हणाले.त्यामुळे भ्रष्टाचार आणि भय हे दाखवण्याचे मुद्दे आहेत या लोकांना कणकवली करांची प्रेम नाही तर स्वार्थच आहे आणि या स्वार्थापोटीच ही सगळी मंडळी एकत्र आली असल्याची टीका ही त्यांनी केली.
मतदान व्हायला काही तास शिल्लक असताना कणकवलीत भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा मोठा राजकीय बॉम्बस्फोट केला आहे. प्रहार भावन येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे कणकवली भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते. मंत्री नितेश राणे म्हणाले,संदेश पारकर यांना भाजपमध्ये घ्यायला आमचे नेते खासदार नारायण राणेंनी स्पष्ट शब्दात नकार दिला. चपट्या पायाच्या लोकांना पक्षात घेऊ नका असा आदेश दिला. जर तीस कोटी रुपये आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी संदेश पारकर यांना दिले असती तर नितेश राणे रवींद्र चव्हाण हे आम्ही लोक यांच्यासाठी चांगले झाले असतो. भय आणि भ्रष्टाचार मुद्द्यांचा नामशेष झाला असता. भाजप पक्ष किती चांगला आहे हे या लोकांनी ओढून सांगितले असते मात्र मला माझ्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे ज्या काळात राणे कुटुंबियांचा पडता काळ होता त्यावेळी ज्या लोकांनी आमच्या समवेत काम केले कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आम्हाला साथ दिली अशा सर्व कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा होता समीर नलावडे यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन कणकवलीत पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यातील विकास पर्व पुढे घेऊन जायचे आहे आणि म्हणूनच संदेश पारकर ला ठोकर मारून आम्ही समीर नलावडे यांना उमेदवारी दिली आणि त्यांना विजयी करण्यासाठी कणकवलीकर जनता आमच्या सोबत सज्ज आहे.उद्या 2 डिसेंबर रोजी सकाळी कणकवलीकर जनता मतपेटीतून भारतीय जनता पार्टी साठी कमळ या निशाणी वरील बटन दाबून मतदान करतील असा विश्वासही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.


Subscribe






