कणकवली शहरात भटक्या जनावरांचा धुडगूस

वाहनांचे होतंय मोठं नुकसान

नागरिकांकडून प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी

कणकवली : शहरात वाढत्या भटक्या जनावरांच्या संख्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून वाहनधारकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याच्या कडेला अथवा हायवेसह शहरातील विविध ठिकाणी उभी असलेली वाहने ही जनावरे धडक देत असल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. अचानक धडक, आरसे तुटणे, गाड्यांच्या चकत्या व दरवाजांना झालेली हानी अशा अनेक तक्रारी वाहनधारकांकडून समोर येत आहेत. शहरातील भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत असून संबंधित प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः हायवेवर पार्किंग केलेल्या वाहनांच्या नुकसानीस जबाबदार कोण ? याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, भटक्या जनावरांची पकड, पुनर्वसन व नियंत्रणासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. अन्यथा वाहनांचे नुकसान, अपघातांचा धोका आणि वाहतूक कोंडी अशी परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!