कणकवली बाजारपेठेत भाजपाची भव्य प्रचार रॅली, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजप चे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली

कणकवली : भारतीय जनता पार्टीच्या कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कणकवली बाजारपेठेत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री पटकी देवी ते पटवर्धन चौक अशी प्रचंड उत्साहात प्रचार रॅली संपन्न झाली. या रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद जनतेचा लाभला. अनेक मान्यवरांनी या रॅली मध्ये सहभाग घेतला होता घोषणा आणि पक्षाच्या घोषणांनी वातावरणात उत्साह संचारला होता.

भाजपने कणकवली शहरातून पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सायंकाळी प्रचार रॅली काढली. भारतीय जनता पाटीर्चा विजय असो, नितेश राणे तुम्ह आगे बढो हम तुम्हारे साथ है, समीर नलावडे तुम्ह आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारत माताकी जय अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. भाजपच्या प्रचार रॅलीत कार्यकर्ते व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

पटकीदेवी येथून रॅलीला शुभारंभ झाला. रॅलीत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक १७ मधील राष्टÑवादीचे उमेदवार अबिद नाईक, माजी उपनगराध्यक्ष व प्रभाग क्रमांक १३ चे उमेदवार बंडू हर्णे, भाजपचे कणकवली विधासभा मतदारसंघ प्रमुख मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, उमेदवार राकेश राणे, प्रतीक्षा सावंत, स्वप्नील राणे, माधवी मुरकर, मेघा गांगण, सावी मुंज, सुप्रिया नलावडे, गौतम खुडकर, आर्या राणे, मेघा सावंत, मयुरी चव्हाण, मनस्वी ठाणेकर, अण्णा कोदे, विश्वजित रासम, संजय कामतेकर, राजश्री धुमाळे, विशाल कामत, राजू गवाणकर, भरत उबाळे, संदीप नलावडे, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पटकी देवी येथून सुरू झालेल्या रॅलीचा आप्पासाहेब पटवर्धन चौक सांगता झाली. रॅली दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यापारी व नागरिकांची संवाद साधला.

error: Content is protected !!