Category देवगड

शिरगाव-साटमवाडी आजीच्या गळ्यातील सोन्याची माळ लंपास करणारा डोंबिवलीत जेरबंद

सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि मानवी कौशल्याच्या आधारे सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई; आरोपी देवगड पोलिसांच्या ताब्यातदेवगड : शिरगाव-साटमवाडी येथे वयस्कर महिलेच्या गळ्यातील तब्बल १ लाख ७५ हजार रुपये किमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण…

“आनंदवाडी मत्स्यबंदराचा होणार कायापालट”

मंत्री नितेश राणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत करणार बंदराची उद्या २१ ऑगस्ट रोजी पाहणी मत्स्यउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले राहणार उपस्थित बंदरातील कामाचा घेणार आढावा,आणि विकासकामांचे होणार सादरीकरण मंत्री नितेश राणे यांच्या निर्णयामुळे अठरा वर्ष प्रलंबित असलेल्या आनंदवाडी बंदराला मिळणार…

आजी – आजोबांवर कोयत्याने हल्ला

गुरांच्या मालकीचा वाद; नातवाला २ दिवसांची पोलीस कोठडी देवगड : एका क्षुल्लक कारणावरून नातवाने आपल्या आजी-आजोबांवर कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मधुकर रामजी बांवकर (वय ८४) व त्यांची पत्नी आनंदी मधुकर बांवकर (७०, दोघे रा. दहिबांव-बांवकरवाडी)…

देश महासत्ता होण्यासाठी तरुणाईने जागृत रहा, विज्ञानाची कास धरा – आमदार प्रमोद जठार

विजयदुर्ग किल्ल्यावर “विश्व हेलियम दिन” उत्साहात साजरा विजयदुर्ग : सद्यस्थितीत विद्यार्थी, तरुण-तरुणीनी देशाच्या भविष्यासाठी विज्ञानाची कास धरली पाहिजे. जपान, जर्मनी, अमेरिका आदी देश महासत्ता होत असताना जेन जीनी प्रत्येक विषयात प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना जागृत ठेवलं आणि का…. असं का…

देवगडमधील गुरांच्या कोंडवाड्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते १३ ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन

मोकाट गुरांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार देवगड : देवगड नगरपंचायतीच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या गुरांच्या कोंडवाड्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते गुरुवारी, दि. १३ ऑगस्ट दुपारी १.३० वाजता l करण्यात…

पशुसंवर्धन सभापती दादा साईल यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन विभाग पुन्हा एकदा नव्याने उभारी

देवगड येथे वासराच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून डोळा पूर्ववत डोळ्याला काटा लागल्यामुळे झाली होती गंभीर दुखापत सिंधुदुर्ग : पशुसंवर्धन सभापती दादा साईल यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन विभाग पुन्हा एकदा नव्याने उभारी घेत असून देवगड तालुक्यातील रामेश्वर येथे एका वासराच्या डोळ्याला काटा…

कुणकेश्वर येथील युवक समुद्रात बुडाला

खेकडे पकडण्यासाठी गेला असता घडली दुर्घटना देवगड : कुणकेश्वर येथील खालचीवाडी परिसरातील रहिवासी चेतन मोहन परब (वय ३५) यांचा समुद्रात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन परब हे…

चिरे कापण्याच्या मशीनवर पडून चिरेखाण कामगाराचा मृत्यू

देवगड तालुक्यातील लिंगडाळ येथील घटना देवगड : तालुक्यातील लिंगडाळ येथील चिरेखाणीवरील कामगार सुखदेव बड्डा तेकाम (३६, मूळ रा. कोडल, तेंदूखेडा, जि. दमोह, रा. मध्यप्रदेश) हा चिरे कापण्याच्या मशीनवर पडून गंभीर जखमी झाला. त्याला देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील…

घरगुती वादातून महिलेला धमकी व शिवीगाळ

देवगड तालुक्यातील शिरगाव येथील घटना पती-पत्नी विरूध्द गुन्हा दाखल देवगड : घरगुती वादातून महिलेला धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी आरती दीपक शिंदे (५०, रा. पनवेल) व दीपक वसंत शिंदे (५२, रा. पनवेल) या पती-पत्नी विरूध्द देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात…

error: Content is protected !!