बांदा-मडूरा येथे एसटी व पिकअप टेम्पोत अपघात

बांदा – शिरोडा डोंगल रस्त्यावर मडुरा आयनाकडे एसटी बस व पिकअप टेम्पो यांच्यात समोरासमोर अपघात झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले नाही. पिकअप टेम्पो विरुद्ध दिशेने येत असल्याचे पाहून एसटी चालकाने आधीच एसटी थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. एसटी विभागाचे सावंतवाडी येथील अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. अखेर दोन्ही बाजूने सामंजस्य झाल्याने या अपघाताची नोंद बांदा पोलिसात नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. हा अपघात बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडला.

error: Content is protected !!