प्रत्यक्षात कामे न करताच १ कोटी ३६ लाखाची काढली बिले
माजी आमदार वैभव नाईक यांनी वनमंत्री व मुख्य सचिवांकडे केली तक्रार
कणकवली आणि कुडाळ वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये ३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. राजेंद्र दत्तात्रय हुणकीकर यांनी तर १ कोटी ३६ लाख ८४ हजार रुपयांची विकास कामे मंजूर करून ती आपल्या मर्जीतील मजूर संस्थांनाच वाटप केली असून प्रत्यक्षात कामे न करताच केवळ कागद रंगवून कामांची देयके काढली आहेत. शासकीय निधीत भ्रष्टाचार करून राजेंद्र हुणकीकर हे आता स्वतःची बदली परजिल्ह्यात करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारी हुणकीकर यांना कोणाचा पाठिंबा आहे असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती, गवारेडे असे वन्यप्राणी शेती फळबागायतींचे नुकसान करीत असताना वनविभागाचे अधिकारी मात्र कायदे धाब्यावर बसवून शासकीय निधीत भ्रष्टाचार करण्यात व्यस्त आहेत. आणि भ्रष्टाचार लोकांना समजण्याअगोदर अधिकारी स्वतःची बदली परजिल्ह्यात करून घेण्याची नवीन पद्धत जिल्ह्यात रुजविली जात आहेत अनेक शासकीय विभागात असे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे कणकवली वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत मंजूर सर्व कामांची सखोल चौकशी करावी तोपर्यंत राजेंद्र हुणकीकर यांची अन्यत्र कुठेही बदली करू नये अशी तक्रार वनमंत्री गणेश नाईक व वनविभागाचे मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे वैभव नाईक यांनी पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहेत कि, कणकवली वनपरिक्षेत्रासाठी जिल्हानियोजन मधून १ कोटी ३६ लाख ८४ हजार ३२ रु निधी मंजूर करण्यात आला होता. सदर निधीमधून कणकवली वनपरिक्षेत्राच्या विकासाची कामे मंजूर करणे आवश्यक असताना कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र दत्तात्रय हुणकीकर यांनी आपल्या व ठेकेदाराच्या फायद्यासाठी अनावश्यक स्वरुपाची २१ कामे मंजूर केली आहेत. या कामांची यादी सोबत देत आहे. यापैकी एकाच मजूर संस्थेला एकूण १२ कामे देण्यात आली आहेत. तसेच शासनाच्या काम वाटप नियमाचे ( मजूर संस्था ३३ टक्के, सुशिक्षितबेरोजगार अभियंता ३३ टक्के, खुला प्रवर्ग ३३ टक्के) उल्लंघन करून उर्वरित ९ कामे देखील आपल्या मर्जीतील मजूर संस्थांनाच देण्यात आली असून श्री. राजेंद्र दत्तात्रय हुणकीकर यांनी शासनाच्या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत आहे. तरी या सर्व कामांची तसेच कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. राजेंद्र दत्तात्रय हुणकीकर यांची सखोल चौकशी करावी, तोपर्यंत राजेंद्र हुणकीकर यांची अन्यत्र कुठेही बदली करू नये अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी पत्रात केली आहे.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111

Subscribe










