स्वखर्चाने घेऊन दिला पाण्याचा पंप
कुडाळ : वालावल – हुमरमळा येथील करमळीवाडी येथे राहणाऱ्या सचिन पेडणेकर यांच्या पाण्याचा प्रश्न स्वानंद उपाध्ये यांनी सोडवला.
सचिन पेडणेकर यांच्याकडे पाण्याचा पंप नसल्यामुळे पेडणेकर कुटुंबीयांचे हाल होत होते. सचिन पेडणेकर यांनी ही बाब युवासेनेचे स्वानंद उपाध्ये यांच्या कानावर घातली. स्वानंद उपाध्ये यांनी स्वखर्चाने पंप घेऊन देत पेडणेकर यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. याबद्दल पेडणेकर कुटुंबीयांनी उपाध्ये यांचे आभार मानले.