खारेपाटणला नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

कणकवली : खारेपाटण रामेश्वरनगर येथे भाड्याने राहत असलेल्या नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सौ. बबिता रुपेश महातो (पूर्वाश्रमीची विनतीकुमारी परमेश्वर महातो) (२२, मूळ रा. बिहार) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येची ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

विनतीकुमारी यांचे रुपेश महातो याच्याशी एका महिन्यापूर्वी लग्न झाले होते. ते दोघेही खारेपाटण रामेश्वरनगर येथे भाड्याने राहत होते. त्यादरम्यान सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बबिता यांचा मृतदेह राहत्या घराच्या पडवीमधील लोखंडी बारला ओढणीच्या साह्याने गळफास लावल्या स्थितीत मिळून आला. रुपेश हा वेल्डिंगचे काम करून आपली उपजीविका करतो. या घटनेची खबर सहदेव नारायण कोंडविलकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करीत आहेत.

error: Content is protected !!