कासार्डेतील सिलिका वाळूच्या अवैध उत्खननावर कारवाईसाठी शिवसेनेने केले कणकवली प्रांत कार्यालय येथे धरणे आंदोलने
वैभव नाईक,परशुराम उपरकर, राजन तेली, सतीश सावंत, सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती
कासार्डे येथील अवैध मायनिंगचा आका कोण? अवैध मायनिंगला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध, बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या एम. एम. सी. एल कंपनीची चौकशी झालीच पाहिजे. बंद करा, बंद करा हप्ते वसुली बंद करा. शासनाचा महसूल बुडविणाऱ्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध अशा घोषणा देत फलक झळकवत कासार्डे येथे अवैधपणे सुरूअसलेल्या सिलिका वाळू उत्खननावर कारवाईच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर, राजन तेली, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज कणकवली प्रांताधिकारी कार्यालयाच्या गेटवर धरणे आंदोलन छेडण्यात आले. मात्र आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी प्रांताधिकारी बाहेर न आल्याने. शिवसेना नेत्यांनी प्रांताधिकारी यांच्या केबिनमध्ये धडक देत प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना जाब विचारत खडेबोल सुनावले.
कासार्डे येथे ३९ हेक्टर जमिनीत उत्खननाची परवानगी असताना सुमारे १ हजार हेक्टर जमिनीवर अवैधपणे सिलिका वाळूचे उत्खनन केले जात आहे. लीज नसलेल्या जागेत वाळू माफिया ट्रेडिंगच्या नावाखाली सिलिका वाळूचे अवैध उत्खनन करीत आहेत.आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने कासार्डेतील अवैध मायनींग विरोधात दीड महिना आवाज उठवीत आहोत, त्यावर काहीच कारवाई होत नाही. त्याठिकाणी तहसीलदार अथवा तुम्ही प्रांताधिकारी म्हणून पाहणी देखील केलेली नाही. मात्र वैभव नाईक यांच्या क्रशरला जिल्ह्याधिकाऱ्यांची रीतसर परवानगी असताना भाजपने सकाळी केलेल्या तक्रारीवरून तहसीलदार संध्याकाळी कारवाईसाठी गेले. त्यामुळे अवैध मायनींगला एक वेगळा न्याय, आणि वैभव नाईक यांना वेगळा न्याय का? अशी विचारणा राजन तेली आणि परशुराम उपरकर यांनी प्रांताधिकाऱ्यांना करून खडेबोल सुनावले. द्वेषापोटी तुम्ही उलट आमच्या चौकशा लावत असाल आणि आम्ही त्यामुळे घाबरून कासार्डे विषयात गप्प बसू असे तुम्हाला वाटत असेल तर तसे कधीच होणार नाही. तुमच्यावर ज्यांचा दबाव आहे त्यांना आमचा निरोप द्या आम्ही असल्या चौकशांना घाबरणार नाही. असे वैभव नाईक यांनी ठणकावून सांगितले. अवैध उत्खननाला तुम्ही पाठीशी घालताय हे आम्ही कधीच खपवून घेणार नाही. जोपर्यत कारवाई होत नाही तोपर्यत आम्ही मागे हटणार नाही असे वैभव नाईक, परशुराम उपरकर, राजन तेली,सतीश सावंत, सुशांत नाईक यांनी सांगितले.
यावेळी प्रांताधिकारी यांनी कासार्डे नागसावंतवाडी येथे मी पाहणी केली आहे तेथे उत्खनन सुरु नाही असे पुन्हा उत्तर दिल्याने शिवसेना नेते संतप्त झाले. नागसावंतवाडी म्हणजे पूर्ण कासार्डे नाही.तुम्ही संपूर्ण कासार्डे सजाची पाहणी करा. तुम्ही जबाबदार अधिकारी आहात बेजबाबदार उत्तरे देऊ नका. आणि जर कासार्डेतील उत्खनन नियमात असेल तर आम्हाला नियमानुसार उखनन चालू आहे असे लेखी पत्र द्या असे सतीश सावंत यांनी सांगितले. मात्र तसे पत्र देण्यास प्रांताधिकारी यांनी नकार दिला. त्यावर तुम्ही पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काम करताय आणि शासनाचा महसूल बुडविताय, एम. एम. सी. एल कंपनीचे तुम्ही पाठीराखे आहात असा आरोप शिवसेना नेत्यांनी करत अवैध उत्खनात कारवाई कशी होत नाही हे आम्ही पाहतो. कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. लोकायुक्त, हायकोर्ट आणि हरित लवादाकडे याप्रकरणी दाद मागणार असल्याचे परशुराम उपरकर यांनी सांगितले. तसेच तहसीलदार कोणाकोणाकडून हप्ते घेतात ते आम्हाला माहित आहे. महिन्याभरात त्यांना अँटी करप्शनकडे पकडून देणार असे राजू राठोड यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत,उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर,तालुका संघटक राजू राठोड,राजू राणे, महिला तालुकाप्रमुख माधवी दळवी,तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, धनश्री मेस्त्री, सौ. अवसरे,रुपेश आमडोस्कर, तेजस राणे,रोहित राणे,आशिष मेस्त्री,तात्या निकम,सिद्धेश राणे,चंदू परब,गुरुनाथ पेडणेकर,आदित्य पालव,वैभव मालंडकर,विलास गुडेकर, संतोष परब,सचिन राणे, प्रमोद कावले,मुरलीधर परब यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










